हैदराबाद : हिमोफिलिया आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा करण्यात येतो. हिमोफिलिया वर्ल्ड फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष फ्रँक श्नेबेल यांनी हिमोफिलिया या आजाराबाबत कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या 17 एप्रिल या वाढदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्तीच्या शरीरातून येणाऱ्या रक्तासंबंधी हा आजार आहे. या आजारामुळे व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठवण्याचा घटक नसल्यामुळे रक्तस्त्राव होतो. मात्र या आजाराबाबत अद्यापही फार जनजागृती करण्यात आलेली नसल्याने हा आजाराबाबत नागरिकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे जाणून घेऊया काय आहेत या आजाराची लक्षणे आणि इतिहास याबाबतची माहिती.
काय आहे हिमोफिलिया आजार : व्यक्तीच्या शरीरात या आजारामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया धिम्या गतीने होते. हिमोफिलिया आजार झालेल्या व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठवण्याचा घटक नसतो. या व्यक्तीला थोडासा मार लागल्यास त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या जखमा होऊन त्या लवकर भरुन येत नाहीत. जनुकातील बदलामुळे हिमोफिलिया हा आजार होत असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. त्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव आढळून आल्यास तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यासह थोडेही काही लागल्यास जखमा मोठ्या होऊन जास्त रक्तस्त्राव होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. हिमोफिलिया हा अत्यंत दुर्मीळ आजार असून 10 हजार नागरिकांपैकी केवळ एक नागरिक या आजाराने बाधित असल्याचे त्याच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
हिमोफिलियाचे आजाराचे प्रकार : जनुकातील बदलामुळे गोठलेल्या प्रथिनांना योग्य प्रकारे कार्य करण्यापासून रोखता येते. ही जनुके एक्स गुणसूत्रावर आधारित असतात असतात. मात्र महिलांपेक्षा पुरुषांना हिमोफिलिया आजार होण्याची अधिक शक्यता असते. हिमोफिलिया हा आजार दोन प्रकारचा असून हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी असे त्याचे प्रकार पडतात. यापैकी हिमोफिलिया ए हा त्याचा सामान्य प्रकार असल्याचे नमूद करण्यात येते. या प्रकारात रुग्णाच्या रक्तात गुठळ्या तयार होण्यासाठी आवश्यक असलेल्या 'फॅक्टर 8' ची कमतरता असते. तर हिमोफिलिया बी या प्रकारात फॅक्टर ९ ची कमतरता असते. ती गुठळ्या तयार होण्यासाठी आवश्यक असते. यातील हिमोफिलिया ए 5 हजार नागरिकांपैकी 1 व्यक्तीमध्ये आढळते, तर हिमोफिलिया बी 20 हजार लोकांपैकी 1 नागरिकांमध्ये आढळत असल्याची माहिती तज्ज्ञ व्यक्त करतात.
काय आहे हिमोफिलिया दिनाचा इतिहास : हिमोफिलिया या आजाराची सुरुवात दहाव्या शतकात झाल्याची नोंद आहे. यावेळी व्यक्तीला मार लागून जखमा झाल्यानंतर रक्तस्त्राव होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला. हिमोफिलिया या आजाराला तेव्हा अबुलकेसिस असे नाव देण्यात आले होते. फिलाडेल्फियाचे डॉ. जॉन कॉनरॅड ओटो यांनी 1803 मध्ये ब्लीडर्सचा अभ्यास सुरू केला. त्यातून त्यांनी हा आजार अनुवांशिक असून तो पुरुषांना त्यांच्या मातांद्वारे पसरत असल्याचा निष्कर्ष काढला. हिमोफिलियाची आनुवंशिक स्थिती 1937 मध्ये या आजाराला ए आणि बी अशा दोन श्रेणीत विभागण्यात आले. मात्र वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया (WFH) ने 1989 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची स्थापना केली. फेडरेशन ऑफ हिमोफिलियाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या फ्रँक श्नबेल यांचा 17 एप्रिल या वाढदिवसालाच जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
हेही वाचा - Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांडला का म्हणतात भारतीय इतिहासातील काळा दिवस, वाचा सविस्तर