दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच, 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचा आठवडा हा 'स्तनपानाची सुरक्षा: एक सामायिक जबाबदारी' या विषयावर साजरा होत आहे. त्याचबरोबर, वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट अॅक्शनने (डब्लूएबीए) सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या आठवड्याला साजरा करण्याचे उद्दिष्टे हे नागरिकांना स्तनपानच्या महत्वाबाबत माहिती देण्याबरोबरच जास्तीत जास्त नागरिकांना या मोहिमेत सामील करणे असे आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक आरोग्यात सुधारणेसाठी स्तनपानाच्या सुरक्षिततेवर कारवाईला प्रोत्साहन देणे असे आहे.
जगभरातील प्रत्येकजण या वस्तुस्थितीबद्दल जागरूक आहे की, मातेचे दूध हे कमीत कमी 6 महिन्यांपर्यंत वय असलेल्या नवजात बाळासाठी विशेष आणि सर्वोत्म आहार आहे. यात सर्व आवश्यक पोषक घटक असतात आणि ते बाळाला काही संसर्ग आणि अॅलर्जींशी लढण्यास देखील मदत करतात. त्याचबरोबर, मातेचे दूध हे बाळ आणि मातेमधील बंध निर्माण करतो. जन्माच्यावेळी बाळाला दिलेली सर्वोत्तम भेट म्हणजे आईचे दूध आहे, जे बाळासाठी विशिष्ट आहे, अशी माहिती हैदराबाद येथील रेनबो बाल रुग्णालयातील सल्लागार नवजात तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. विजयानंद जमालपुरी यांनी सांगितली.
आईच्या दुधाचे गुणधर्म आणि फायदे
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. श्रीकांतबाबू पेरुगू ( बीएएमएस, एमडी आयुर्वेद) यांच्यानुसार आईच्या दुधाचे गुण हे बाळाचे योग्य पोषण आणि विकास सुनिश्चित करते. हे गुणधर्म पुढील प्रमाणे आहे,
- दुधाचा रंग सामान्य असावा.
- दुधाला नैसर्गिक गंध असावा.
- दुधाची चव थोडी गोड आणि रुचकर असावी.
- एक कप पाण्यात दूध टाकल्यास ते सहजरित्या आणि पूर्णपणे विरघळले पाहिजे.
आयुर्वेदाने सांगितलेले आईच्या दुधाचे फायदे पुढीलप्रमाणे आहे,
- जीवनदायी (प्राणादम), याचा अर्थ ते बाळाला जीवन देते.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि अनेक आजारांपासून वाचवते.
- बाळाला सामान्य प्रौढांप्रमाणे चांगल्या प्रकारे वाढू देते.
- शरीरातील उतींचे (body tissue) प्रमाण वाढवते.
- दूध चवीला गोड, पातळ आणि शीतलक असते.
- दूध हे जीवन शक्तिवर्धक असते. (vitaliser)
मातेच्या दुधाची गुणवत्ता कशी वाढवता येईल ?
जर दूध जड, दुर्गंधियुक्त असेल किंवा त्यात चिकट पदार्थ असले, तर ते बाळाला देण्यासाठी योग्य नाही. डॉ. श्रीकांत यांनी स्तनदा मातांमधील दुधाची गुणवत्ता आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आयुर्वेदातील काही औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. त्याचबरोबर, या वनस्पती दुधातील विविध दोष (वाईट घटक) दूर करण्यास मदत करतील, असे ते म्हणाले. डॉ. श्रीकांत यांनी सुचवलेल्या वनस्पती पुढील प्रमाणे आहेत,
1) शतावरी
2) पाठ (Patha)
3) अद्रक
4) देवदार
5) मुस्ता (musta)
6) मुरवा (murva)
7) गुडुची/गिलोय (Guduchi/giloy)
8) किराताटिक्टा (Kiratatikta)
9) कटुजा
10) कटुका रोहिणी (Katuka rohini)
11) सारिवा (Sariva)
12) जिवंती (Jeevanti)
स्तनपानाचे फायदे कोणते?
मुंबई येथील कामा आणि अल्बलेस रुग्णालयाच्या माजी अधीक्षक व प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ज्ञ आणि प्रसुतिशास्त्रज्ञ डॉ. राजश्री काटके यांनी मातांना स्तनपानाचे पुढील फायदे सांगितले आहे,
- बाळ आणि मातेमधील भावनिक बंध हे मजबूत आणि खोल होतात. माता उदास असतानाही ती बाळाला दूध पाजू शकते. माता आणि बाळ यांच्यात निरोगी बंध विकसित होण्यास मदत मिळते.
- स्तनपान करताना ऑक्सिटोसिन हार्मोन सोडला जातो, ते वजन कमी करण्यास मदत करू शकते आणि आई तिचा फिगर परत मिळवू शकते.
- जी माता स्तनपान करते ती ओवरीचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून संरक्षित राहते.
- विशेष स्तनपान करताना आईवर गर्भनिरोधक परिणाम होतील.
- स्तनपान केल्याने स्तन टोन्ड (toned) होतात, त्यामुळे आहार देण्याच्या योग्य पद्धतीने सॅगिंग (sagging) होणार नाही.
हेही वाचा - रात्री उशिरा खाणे टाळा, होऊ शकतात 'या' समस्या