ETV Bharat / sukhibhava

जाणून घ्या, कोविड- १९मधून बरे झाल्यानंतरही का बाळगली पाहिजे सावधगिरी

author img

By

Published : May 24, 2021, 3:33 PM IST

गेल्यावर्षीपासून लोकांच्या मनात कोविड-१९ च्या संबंधांने प्रश्न निर्माण झाले आहेत आणि दररोज नवीनच शंका उपस्थित होते. आमच्या तज्ञांच्या मदतीने इटीव्ही भारत सुखीभव भारत तुमच्या प्रत्येक शंकेचे निराकरण करून उत्तरे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून, आज आम्ही हैदराबाद स्थित व्हीआयएनएन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले तज्ञ डॉ. राजेश वुक्कला यांच्याशी, कोविडचा पुन्हा संसर्ग झाला तर काय, कोविड झाला असताना आणि त्यातून बरे झाल्यावर किती काळ अत्यंत महत्वाचा असतो आणि कोविडमधून बरे झाल्यावर गुतागुंत निर्माण होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे, यावर चर्चा केली.

Why should caution be exercised even after recovery from Covid-19?
१९मधून बरे झाल्यानंतरही का बाळगली पाहिजे सावधगिरी

कोविडमधून बरे झाल्यावरही पुन्हा संसर्ग का होतो आणि बरे झाल्यानंतरचा कालावधी महत्वाचा का आहे. आम्ही खाली जी माहिती देत आहोत, ती तुम्हाल ज्ञात असणे आवश्यक आहे. कोविड-१९ चा पुन्हा संसर्ग झाल्यावर त्यातून बरे होणे आणि त्यानंतरचा कालावधी का अत्यंत महत्वाचा आहे?

भारतात कोविड-१९ च्या दुसर्या लाटेने निर्माण केलेला प्रकोप सुरू असतानाच, कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तसेच एकदा कोविडमधून बरे झाल्यावरही पुन्हा कोविडचा संसर्ग झाल्याच्या तक्रारी लोक करू लागले आहेत. परंतु, आता कोविडचा संसर्ग झाल्यामुळे किंवा लस घेतल्यामुळे अनेक लोकांच्या शरिरात जे अँटीबॉडीज(प्रतिपिंड) तयार झाले आहेत, त्यामुळे पुन्हा संसर्ग होणे शक्य आहे का? तसेच, एकदा संसर्ग झाल्यावर, त्यानंतरचा दुसरा आठवडा आणि कोविडमधून पूर्ण बरे झाल्यानंतरचे दोन आठवड्यांचा कालावधी हा का अत्यंत महत्वाचा आहे? हैदराबाद स्थित व्हीआयएनएन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले तज्ञ डॉ. राजेश वुक्कला(एमडी, जनरल फिजिशियन) यांना इटीव्ही भारत सुखीभवने यासंदर्भात शंका विचारल्या आणि त्यांनी आम्हाला खालीलप्रमाणे माहिती दिली.

कोविडमधून एकदा बरे झाल्यावर पुन्हा संसर्ग का शक्य आहे?

डॉ. वुक्कला म्हणाले की, गेल्या वर्षभरापासूनच कोविडचा विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहे आणि आता जो नवीन उत्परिवर्तन झालेला विषाणु संसर्ग करत आहे, तो पहिल्यासारखा नाही. म्हणून, कोविड प्रतिबंधक लस किंवा पूर्वीच्या संसर्गाने तुमच्यात जी काही रोगप्रतिकारक शक्ति निर्माण झाली आहे, ती सामान्यपणे आढळणारी रोगप्रतिकारक शक्ति आहे आणि विशिष्ट जातीच्या विषाणुसाठी ती काम करणारी नाहि. त्यामुळे प्रथम कोविडमधून बरे झाल्यावरही तुम्हाला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे, परंतु पहिल्यासारखा तीव्र संसर्ग आता असणार नाहि. एकदा विषाणुचा संसर्ग झालेली व्यक्ति तीन ते सहा महिन्यांपर्यंत अँटीबॉडीज स्वतःमध्ये विकसित करतो, असे अनेक तज्ञांकडून आणि माध्यमांतून दावा केला गेला आहे. याबाबत विचारले असता, डॉ. वुक्कला यांनी माहिती दिली की, कोविडचा पुन्हा संसर्ग नेमका किती काळानंतर होईल, याबाबत निश्चित काही ठरवता येणार नाहि. व्यक्तिचे वय, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ति, संलग्न परिस्थिती किंवा व्यक्तिला असलेले असाध्य आजार आणि विषाणुचे प्रमाण म्हणजे किती प्रमाणात त्यांना अगोदर संसर्ग झाला होता, या अनेक घटकांवर त्याला किंवा तिला पुन्हा संसर्ग होणे अवलंबून असते. त्याचप्रमाणे, एखाद्याच्या शरिरात विषाणु कोणत्या मार्गाने प्रवेश करतो आहे, यावरही संसर्गाची तीव्रता अवलंबून राहिल.

कोविड आजार झाला असताना आणि त्यातून बरे होऊन बाहेर आल्यावर किती काळ अत्यंत महत्वाचा आहे?

संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून मोजायला सुरूवात केली तर तेथून ७ ते १४ दिवस अत्यंत महत्वाचे असतात, अशी आमच्या तज्ञांनी माहिती दिली. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, शरिर कसा प्रतिसाद देते, यावर नजर ठेवण्यासाठी ७ वा ते ९ वा दिवस हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. शरिरात सहा दिवस मुक्काम केल्यावर विषाणुचे प्रमाण याच कालावधीत सर्वाधिक असते आणि त्यामुळे शरिरात दाहक प्रतिसाद निर्माण होतो. म्हणजे, शरिर विषाणुला सर्वाधिक प्रतिसाद देण्यास सुरूवात करते. याला सायटोकाईन वादळ असे म्हटले जाते. या सायटोकाईन वादळाच्या कालावधीत, शरिरात अनेक प्रकारची रसायने पाझरत असतात आणि परिणामी, त्यातून फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया, हगवणीसारखे आतड्याचे रोग निर्माण होतात, ह्रदयविकाराचा धक्का अशा अनेक दाहक प्रक्रिया सुरू होतात. डॉ. वुक्कला यांनी सांगितले की, कोविडमुळे मी एका रूग्णाच्या ह्रदयाचे ठोके १५० ते १६० बीपीएम इतके वर गेलेलेही मी पाहिले आहेत. या अवस्थेला Tachyarrhythmias असे म्हटले जाते. आणि, याच्या अगदी विरूद्ध, काही लोकांच्या ह्रदयाचे ठोके ३० ते ४० बीपीएम इतके खाली आलेलेही मी पाहिले आहेत. याला Bradyarrhythmias असे म्हटले जाते. मात्र या अवस्था खूप थोड्या कालावधीसाठी रहाणार्या असतात आणि या अवस्था निर्माण होण्याचे कारण मायोकार्डिटिस(ह्रदयातील दाह) हेच आहे, जे विषाणुच्या संसर्गापेक्षा दुय्यम आहे. कोविडमधून बरे झाल्यावर म्हणजे १४ दिवसांनी रूग्णांमध्ये गाठी निर्माण होण्याच्या समस्या दिसल्या आहेत, अशी माहितीही डॉ. वुक्कला यांनी दिली. या गाठी निर्माण झाल्याचा परिणाम मेंदू, ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसह शरिरातील इतर अवयवांवर होतो. यामुळे शरिराच्या चलनवलनातच अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ, मेंदूत गाठ निर्माण झाली तर त्याचा परिणाम मेंदूत रक्तस्त्रावात होतो आणि त्याचप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका बसू शकतो. फुफ्फुसात गाठी निर्माण झाल्यास श्वसनक्रियेला झटका बसतो किंवा तिच्यात अवरोध निर्माण होतो. कोविडमधून बरे झाल्यानंतर दुसर्या आठवड्यात या प्रमुख समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोविडमधून बरे झाल्यावरही गाठी निर्माण होणे हा एक प्रमुख काळजीचा मुद्दा आहे. ज्या रूग्णांना विषाणुचा तीव्र संसर्ग झाला होता किंवा ज्यांना उपचारादरम्यान उत्तेजक देण्यात आले होते आणि ज्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण अनियंत्रित आहे, त्यांना कोविडमधून बाहेर आल्यावर म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगससाच संसर्ग होण्याचा आणखी एक काळजीचा मुद्दा आहे. म्हणून, जर तुम्हाला सायनस, चेहऱ्याच्या वेदना इत्यादी लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरशी संपर्क साधा. रूग्णाच्या अवस्थेनुसार त्यावर उपचार करता येऊ शकतात.

कोविडमधून बरे झाल्यावर पुन्हा गुंतागुंत कशी टाळता येईल?

ज्यांना अगोदर तीव्र संसर्ग झाला होता आणि ज्यांच्यावरील उपचारांमध्ये जड औषधांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला आहे, अशा रूग्णांमध्ये बरे झाल्यानंतरही गुंतागुंत होणे हे सामान्य आहे. डॉ. वुक्कला यांच्या म्हणण्यानुसार, माझ्या रूग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी मी त्याचा संपूर्ण आढावा घेतो. मी त्यांच्या रक्ताची संपूर्ण माहिती तपासतो आणि त्याची स्वतःहून चालण्याची तसेच व्यायाम करण्याची क्षमता तपासतो,ज्यातून त्याच्या श्वसनक्रियेची ताकद किती आहे, हे समजून येते. म्हणून, दोन ते चार आठवड्यांसाठी रूग्णाच्या आवश्यकतेनुसार, औषधे दिली जातात.यामुळे खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

• डिस्चार्ज देताना ज्या सूचना केल्या गेल्या आहेत त्यांचे नीट पालन केले पाहिजे आणि औषधे नियमित घेतली पाहिजेत.

• पोषण आहार आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे.

• सर्वात जास्त रूग्णाच्य फुफ्फुसांवर कोविड संसर्गाचा परिणाम होत असल्याने, प्राणायाम आणि इतर श्वसनक्रियेशी संबंधित व्यायाम केले पाहिजेत.तसेच फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी वाफारा घेण्याचा सल्ला दिला जातो. या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

याशिवाय, कोविड-१९ मधून बाहेर आल्यावर तुम्हाला काही नेहमीपेक्षा वेगळे असे काही आढळले किंवा बरे झाल्यावरही ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणे आढळली तर तुमच्या डॉक्टरशी त्वरित संपर्क साधा. अगदी सुरूवातीच्या अवस्थेतच निदान झाले तर अनेक आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. याबाबत अत्यंत दक्ष असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्ही कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेतले असतील आणि तरीही तुम्हाला कोविडची लक्षणे आढळली तर, स्वतःची चाचणी करून घ्या आणि तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधा. संसर्ग सौम्य असला तरीही, त्यावरही उपचारांची आवश्यकता आहेच.

हेही वाचा - हॉस्पिटल्सचे रूपांतर 'कॅश’पिटल्समध्ये झाले आहे त्यावर नियंत्रणाची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.