ETV Bharat / sukhibhava

टाईप 2 मधुमेह असलेल्यांसाठी व्यायामाचे नित्यक्रम कसे असावे? वाचा... - type 2 diabetes

नियमित व्यायाम केल्याने मनुष्याच्या आर्ध्यापेक्षा जास्त शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होऊ शकतात, असा विश्वास डॉक्टर आणि तज्ज्ञांना आहे. तसेच, नियमित व्यायामामुळे मधुमेह व्यवस्थापनातही मदत होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. विशेषत: टाईप 2 मधुमेह पीडितांसाठी व्यायाम आवश्यक आहे कारण, नियमित व्यायाम हे रक्तातील साखर नियंत्रित करणे, तुमचे हृदय आरोग्य सुधारणे, मानसिक आरोग्याला चालना देणे आणि निरोगी वजनापर्यंत पोहचणे आणि ते बनवून ठेवण्यास मदत करते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 25, 2021, 6:49 PM IST

बोस्टन येथील जोसलिन डायबिटीज सेंटरमधील क्लिनिकल एक्सरसाईज फिजियोलॉजी विभागाच्या व्यवस्थापक तथा मधुमेह शिक्षिका जॅकलिन शहर (एम.एड, आरसीईपी, सीडीई) यांच्यानुसार, मधुमेह व्यवस्थापनात व्यायाम हे सुरुवातीच्या काळात कठीण होऊ शकते. परंतु, नियमित व्यायाम हे मधुमेह व्यवस्थापनास उपयुक्त ठरू शकते.

मैसूर येथील योग प्रशिक्षक, ब्यूटी व हेल्थ थेरेपिस्ट तथा ट्रेनर मीनू वर्मा यांनी देखील सदर बाबीचे समर्थन केले आहे. टाईप-2 मधुमेह असलेल्या रुग्णाला सुरुवातीच्या काळात व्यायाम आभ्यास कठीण होऊ शकतो. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केलेला नियमित व्यायाम फक्त मधुमेह व्यवस्थापनच नव्हे, तर शारीरिक क्रियाकलाप वाढविण्यातही मदत करते, त्याचबरोबर ते एकूणच आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, व्यायामाचा नित्यक्रम बनविण्यापूर्वी सर्व खबरदाऱ्या आणि आवश्यकता विचारात घेणे गरजेचे आहे, असा सल्ला मीनू वर्मा यांनी दिला.

मधुमेहात व्यायामासंबंधी सावधगिरी

इंदूर येथील अॅप्पल रुग्णालयातील चिकित्सक डॉ. संजय जैन यांनी, व्यायाम हा निसंशय शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, मात्र मधुमेह विशेषत: टाईप-2 पीडितांनी खबरदारी म्हणून कुठल्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्याआधी चिकित्सकाचा सल्ला अवश्य घ्यावा, असे म्हंटले.

व्यायामासंबंधी सावधगिरीवर प्रशिक्षक मीनू वर्मा यांनीही मत व्यक्त केले. माझ्याकडे येणाऱ्या मधुमेह रुग्णाचा आरोग्य अहवाल पाहूनच मी त्यांच्यासाठी व्यायाम नित्यक्रमाची चरण-दर-चरण योजना तयार करते. हे खूप आवश्यक असल्याचे प्रशिक्षक मीनू वर्मा यांनी सांगितले.

मधुमेह व्यवस्थापनाबाबत प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात जॅकलिन शहर सांगतात की, मधुमेह, उच्च रक्तचाप किंवा अन्य आरोग्य समस्येसाठी औषध घेणाऱ्या लोकांच्या सांध्यांमध्ये किंवा स्नायूंमध्ये समस्या असल्यास त्यांनी व्यायाम करण्याअगोदर चिकितस्कांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा अवस्थेत कुठला आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम सुरक्षित आहे, याबाबत चिकित्सकांकडून जाणून घेणे गरजेचे आहे. अशा रुग्णांनी नियमित व्यायाम सुरू करण्याआधी डोळ्यांची तपासणी देखील करावी, कारण टाईप-2 मधुमेहाचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होतो. जर रुग्णाच्या डोळ्यातील पडद्याला (retina) काही त्रास असले तर मग त्यांना काही व्यायाम करण्याची परवानगी नसते.

जॅकलीन शहर यांच्यानुसार, जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा आपले स्नायू संकुचित होतात आणि शरीराला अधिक उर्जेची आवश्यकता असते. स्नायूंसाठी उर्जा ही ग्लूकोजमधून येते. अशात व्यक्ती जेवढा जास्त व्यायाम करतो तेवढाच जास्त ग्लूकोज बर्न करतो. व्यायाम केल्यानंतर विश्रांती करताना इन्सुलिन रक्त पेशींमध्ये ग्लूकोज पोहचवण्यात मदत करते, तथापि, ग्लूकोज मुक्तपणे देखील या पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. जेव्हा एखादी मधुमेह असणारी व्यक्ती व्यायाम करते तेव्हा ग्लूकोज आणि इन्सुलिनचे हे इंटरॅक्शन (interactions) साखर पातळीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात मदत करते. त्याचबरोबर, जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकरित्या सक्रिय असते, तेव्हा शरीरात इन्सुलिनचा स्त्राव जास्त प्रमाणात होतो. म्हणून नियमित व्यायामाने बऱ्याचदा मधुमेहच्या औषधांची गरज कमी केली जाऊ शकते.

व्यायाम करताना लक्षात ठेवावयाच्या बाबी

अमेरिकन डायबेटीज असोसिएशननुसार (एडीए) टाईप - 2 मधुमेह असलेल्या लोकांनी एक साप्ताहिक व्यायाम योजना (weekly exercise planner) अवलंबावी. ज्यात मध्यम स्तरीय व्यायाम असलेले नित्यक्रम असावे, जे दररोज 30 मिनिटे करता येईल. रुग्णाचे वजन जास्त असल्यास त्याने योग्य आहार पद्धती आणि 60 मिनिटे व्यायामाचे ध्येय ठेवून वजन कमी करण्यावर भर द्यावे.

नियमित व्यायामाच्या मालिकेची सुरुवात नेहमी हलक्या आणि कमी जोखमीच्या व्यायामापासूनच करावी. त्यानंतर हळू-हळू व्यायामाच्या नित्यक्रमाला वाढवले जाऊ शकते. सुरुवातील दिवसातून केवळ पाच मिनीट करावे, त्यानंतर हळू-हळू सोयीनुसार ते वाढवून 10 नंतर 15 मिनिटे करावे. हे तोपर्यंत करावे जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचत नाही. अशा प्रकार दुखापत होण्याची शक्यता कमी होते. जर व्यायाम करण्यात काही समस्या होत असेल तर चिकित्सकाचा सल्ला घ्यावा, अशी शिफारस एडीएने केली आहे.

रुग्णाने आपल्या प्रगतीचा मागोवा घ्यावा. आपल्या शारीरिक कार्याचा लॉग ठेवावा, जसे तुम्ही किती वेळ चालले किंवा जीममध्ये जात असल्यास व्यायामाच्या किती रेपिटेशन्स केल्या. रुग्णाने एक मासिक लॉग देखील ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्यांचे यश आणि अपयशाबद्दल मधुमेह शिक्षक आणि फिटनेस तज्ञांशी चर्चा करता येईल, अशी शिफारसही एडीएने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.