स्तनपानामध्ये अनेक आव्हाने आहेत. विशेष करून बाळंतपणाच्या पहिल्या टप्प्यात. म्हणजे बाळाचा जन्म झाल्या झाल्या. बीआरकेआर सरकारी आयुर्वेदिक काॅलेजचे प्राचार्य बीएएमएस, एमडी असलेले डाॅ. श्रीकांतबाबू पेरुगू सांगतात , 'अनेकदा आईचे दूध बाळासाठी योग्य नसते. आई आजारी असेल, तिला तापाचा संसर्ग झाला असेल तर तिच्या दुधाला संसर्ग होऊ शकतो. शिवाय आईच्या आहाराच्या सवयी, आईची प्रकृती, चुकीचे अन्न इत्यादींमुळे आईचे दूध खराब असू शकते.'
कशी करायची परीक्षा?
आईच्या दुधाची नैसर्गिक चव आणि त्यात बदल झाला नाही, हे खालील प्रकारे तपासता येते.
- एक कप पाण्यात आईचे दूध मिसळा
- ते पूर्णपणे विरघळले तर ते बाळासाठी योग्य आहे.
- ते न विरघळता कपाच्या तळाशी साचून राहिले तर ते बाळाला पिण्यास अजिबात योग्य नाही.
जर दूध जड असेल, त्याला दुर्गंध येत असेल किंवा त्यात चिकट पदार्थ असेल तर ते बाळाला पिण्यास अजिबात योग्य नाही.
उपयोगी आयुर्वेद वनस्पती
'आयुर्वेदात अशा काही वनस्पती आहेत ज्यांच्यामुळे आईच्या दुधाची प्रत सुधारते आणि ते वाढते. त्यांना गॅलॅक्टॅगॉग म्हणतात. या सगळ्या वनस्पती दुधातले दोष काढून टाकतात.'
- शतावरी
यामुळे आईच्या दुधात वाढ होते आणि दुधाची प्रत सुधारते.
२. पाथा
स्तनाचे विविध रोग आणि दूध यावर पाथा एकदम उपयोगी आहे. हे दुधाला शुद्ध करते आणि त्यातले दोष काढून टाकते.
३. आले
हे आईच्या दुधाचे बाळासाठी होणारे पचन, दुधाचे शरीरात होणारे शोषण आणि मिसळून जाणे यात सुधारणा करते. आईच्या दुधातले जडत्व कमी करते आणि त्यातल्या गाठी काढून टाकते. यामुळे आईच्या दुधात वाढ होते.
४. सुरदरू
या वनस्पतीमुळे दुधातले वाईट घटक निघून जातात आणि ते हलके होते.
५. मुस्ता
पित्त दोष नाहीसे करून आईचे दूध शुद्ध करते.
६. मुरवा
ही वनस्पती आईच्या दुधातल्या छोट्या छोट्या गाठी काढून टाकते आणि दुधाचा प्रवाह वाढवते. दुधाची प्रतही सुधारते.
७. गुडूची
गुडूची किंवा गिलोय यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे बाळ आजाराशी लढू शकते.
८. कुताजा
ही वनस्पती आईच्या दुधातला प्रोटोझोल संसर्ग काढून टाकते आणि बाळासाठी दूध स्वादिष्ट आणि पचायला सोपे बनवते.
९. किरातातिक्ता
याचा जास्तीत जास्त वापर आई आणि बाळाचा सर्वसाधारण ताप, संसर्गजन्य ताप किंवा मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी होतो.
१०. कटुका रोहिणी
हे संसर्गाला रोखणारे औषध आहे. विशेष करून हेपटायटीससाठी. स्तनांमध्ये दुधाच्या गाठी तयार झाल्या तर या औषधाने त्या निघून जातात आणि दुधाचा प्रवाह सुधारतो.
११. सरिवा
या वनस्पतीमुळे आईच्या दुधाची चव चांगली होते, ते स्वादिष्ट होते आणि बाळाला दूध पचायला योग्य होते.
१२. जीवनती
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या. त्या खाल्ल्याने आईच्या दुधाची प्रत सुधारते.
म्हणूनच या सर्व वनस्पती आईच्या दुधासाठी उत्तम औषध आहेत. पण यांचे सेवन करण्याआधी परिणाम आणि योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. यातल्या काही वनस्पती परस्पर विरोधी असू शकतात आणि म्हणूनच यांचे सेवन करण्याआधी डाॅक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.