ETV Bharat / sukhibhava

Side effects of Tattoos: टॅटू काढण्याचा मोह आवरेना? त्याआधी वाचा 'हे' गंभीर दुष्परिणाम

खरं तर टॅटू (Tattoo Tradition) ही कला आपल्यासाठी काही नवीन नाही कारण पूर्वापार आपल्याकडे गोंदवून घेतलं जात असे. हे एक प्रकारचे आभूषण समजले जायचे. पण, टॅटूमुळे बरेच गंभीर (serious side effects of tattoos) दुष्परिणामदेखील होतात.

टॅटू काढण्याचे गंभीर दुष्परिणाम
serious side effects of tattoos
author img

By

Published : Oct 19, 2022, 2:23 PM IST

टॅटू काढणे हे आज स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. बॉडीवर ब्लॅक अँड व्हाइटपासुन तर कलरफुल टॅटू काढण्याची फॅशन यूथमध्ये लोकप्रिय झाली आहे. आपल्याला नेहमी नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतात. कधी साडी ट्रेंड तर कधी संपूर्ण अंगावर दागिने टोचून घ्यायचा ट्रेंड. तसेच हल्ली टॅटू ट्रेंडही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. विशेष म्हणजे याचे आरोग्य दृष्ट्या महत्व किंवा परिणाम यांचीही पूर्वीपासून माहिती आणि जाणीव तेव्हापासून होती. टॅटू काढण्याचा मोह आवरत नाहीये पण, टॅटू काढण्यापूर्वी या महत्वाच्या सहा गोष्टी जाणून घ्या...

टॅटूमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम: बऱ्याच लोकांची त्वचा (Skin) खूप नाजूक असते. त्यामुळे त्यांना स्किन इनफेंक्शन (Skin Infection) होण्याची शक्यता जास्त असते. टॅटू काढताना वेगवेगळे रंग (Tattoo Colors) वापरले जातात. विशेषत: लाल, हिरवे, पिवळे आणि निळे रंग. या रंगांमुळे अॅलर्जिक रिअॅक्शन (Allergic Reaction) होऊ शकते. टॅटूच्या जागेवर खाज सुटणे (Itching) यासारख्या अनेक ऍलर्जीक रिअॅक्शनदेखील होऊ शकतात.

टॅटूमुळे त्वचेशी संबंधित अनेक आजार (Diseases) होऊ शकतात. पर्मानेंट टॅटू (Permanent Tattoos) काढण्याच्या वेदनेपासुन वाचण्याासाठी कोणी जर नकली टॅटू (Temporary Tattoos) काढण्याचा विचार करत असेल तर त्यांनी सतर्क राहील पाहीजे. बऱ्याचदा टॅटू काढण्यासाठी वापरलेली शाही (Tattoo Ink) आरोग्यासाठी घातक ठरू शकते. इतर काही बाजारू उत्पादने वापरल्यामुळे त्वचेला उष्णतेचा त्रास होणे, पुरळ येणे, जखम किंवा मोठा व्रण तयार होणे,खड्डा पडणे असे असंख्य त्रास उद्भवू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.