हैदराबाद - ‘साथीच्या रोगाला तोंड देत असताना, आपण आरोग्य सेवांमध्ये त्वरेने केलेले नवे बदल आणि काळजी घेण्याचे नवे तंत्र पाहिले. शिवाय आरोग्याची काळजी घेण्याची सुधारित पद्धतही पाहिल्या. या अनुभवातून आपण बरेच काही शिकायला हवे. 'युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे'च्या निमित्ताने (जागतिक आरोग्य संरक्षण दिन) हे संकट संपवण्याचे आणि आता आपल्या सर्वांचे संरक्षण करणार्या आरोग्य यंत्रणेत गुंतवणूक करून एक सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवण्यास वचनबद्ध होऊ या.’ संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस, अँटेनिओ गुटेरेस म्हणतात.
दरवर्षी १२ डिसेंबर रोजी 'युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे' साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्र संघाने जगभरात प्रत्येक व्यक्तीला परवडेल आणि चांगल्या दर्जाची अशी आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असे एकमताने प्रत्येक देशाला सांगितले. म्हणून हा दिवस युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे म्हणून साजरा होतो. संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेल्या सुधारित टिकाऊ विकास लक्ष्य (एसडीजी) मध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. या वर्षीची थीम " सर्वांसाठी आरोग्य, प्रत्येकाचे संरक्षण " अशी आहे.
जागतिक आरोग्य संरक्षण (युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे) का?
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज हा विश्वास देते की कुठल्याही जात, पंथ, वंश, लिंग आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा मिळतात. मग त्यांची आर्थिक स्थिती कशीही असो, कितीही अडचणी असोत. निरोगी लोकसंख्येमुळे देश अधिक चांगल्या आर्थिक विकासाच्या मार्गावर जाईल. विशेषत: आता जागतिक महामारीला तोंड देत असताना, प्रत्येकाला समान आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हे आपण निश्चित केले पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाचा लोकसंख्येच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. शास्वत विकास आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. सामाजिक असमानता कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये हा महत्त्वाचा घटक ठरतो. हे जागतिक संरक्षण म्हणजे आपल्या नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी असलेली सरकारची बांधिलकी मानली जाते.
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज कसे मिळवता येईल ?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते देशाला किंवा समाजाला जागतिक आरोग्य संरक्षणापर्यंत पोचायचे असेल तर बऱ्याच गोष्टी योग्य ठिकाणी हव्यात. मजबूत, कार्यक्षम, चांगल्या प्रकारे चालणारी आरोग्य यंत्रणा लोकांना केंद्र स्थानी ठेवून प्राथमिक आरोग्य गरजा भागवते. परवडू शकेल अशी आरोग्य सेवेला आर्थिक मदत करणारी व्यवस्था हवी. त्यामुळे लोकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. हे अनेक प्रकारे करता येईल. वैद्यकीय समस्यांचे निदान आणि उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश उत्तम सुविधांच्या आधारे रूग्णांच्या गरजा भागवण्यासाठी सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशिक्षित, सेवाभावी आरोग्य कर्मचार्यांची पुरेशी क्षमता आवश्यक आहे.
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजचे फायदे -
नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजमुळे खालील प्रकारे फायदा होऊ शकेल -
- लोकांचे आरोग्य सुधारेल
- कार्यक्षम, जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य यंत्रणा
- गरिबी कमी होईल
- निर्मिती वाढेल
- नोकऱ्या जास्त वाढतील
- आर्थिक संरक्षण होईल
- मोठा नि:पक्षपात
युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजसाठीची तत्त्वं -
भारतात युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज करण्यासाठी एनएचपीने १० मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
- सर्वसमावेशकता
- नि:पक्षपातीपणा
- भेदभाव न करणे
- तर्कसंगत आणि चांगल्या दर्जाची सर्वसमावेशक काळजी
- आर्थिक संरक्षण
- रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण
- मजबूत सार्वजनिक आरोग्याची तरतूद
- दबाबदारी आणि पारदर्शकता
- समूदायाचा सहभाग
- आरोग्याची जबाबदारी लोकांवर देणे
म्हणूनच दर्जेदार आरोग्य सेवा हा माणसाचा अधिकार आहे आणि जगात यापासून कुणीही वंचित राहता कामा नये. व्यक्तीला त्याच्या आर्थिक दर्जावरून आरोग्य सेवा मिळावी किंवा मिळू नये, हे ठरता कामा नये. देशात सर्वांना आरोग्य संरक्षण मिळावे यासाठी सरकार महत्त्वाची भूमिका साकारते.