हैदराबाद : Skin Care Tips प्रवास करायला कोणाला आवडत नाही? तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत नवीन ठिकाणांना भेट देणं, वेगवेगळे पदार्थ खाणं, नवीन लोकांना भेटणं आणि बरेच काही तुमची सहल संस्मरणीय बनवतं. पण अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या प्रवासाची आठवण करून देत असते, ती म्हणजे तुमची निर्जीव त्वचा ज्याची तुम्ही प्रवास करताना सहसा काळजी घेत नाही.
त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं : प्रवासादरम्यान तुमच्या त्वचेला ऊन, धूळ, माती, बदलते हवामान आणि इतर अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमची त्वचा शुष्क दिसते. याशिवाय मुरुमे, सन बर्न, काळे डाग आदी समस्यांनाही अनेकदा सामोरं जावं लागतं. त्यामुळं प्रवासादरम्यानही त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, पण कधी-कधी ते खूप अवघड वाटतं, त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
- मॉइश्चरायझर : प्रवास करताना बदलत्या हवामानामुळे त्वचा अनेकदा कोरडी होते, त्यामुळे तुमची त्वचा कोरडी दिसते. तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ ठेवा. हायड्रेटिंग टोनर तुम्हाला यामध्ये मदत करू शकते.
- ट्रॅव्हल साइज प्रोडक्ट : प्रवास करताना तुम्ही कमीत कमी नग बाळगण्याचा प्रयत्न करता. काही दिवसांचाच प्रश्न आहे, असा विचार करून, तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं बरोबर घेत नाही. अशा परिस्थितीत ट्रॅव्हल साइझ प्रॉडक्ट तुम्हाला मदत करू शकतात. तुम्हाला ट्रॅव्हल साइझ प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करायचे नसल्यास, तुम्ही लहान आकाराची बाटली खरेदी करू शकता आणि त्यात तुमची उत्पादनं घेऊन जाऊ शकता.
- सन स्क्रीन : हिवाळा असो, उन्हाळा की पावसाळा, दिवसा सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचे आहे. हे केवळ सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनच संरक्षण करत नाही तर वार्धक्यामुळे उद्भवणारे त्वचाविकार, काळे डाग इत्यादींपासून देखील संरक्षण करतं.
- हायड्रेशन : प्रवास करताना शरीरात पाण्याची कमतरता हे तुमच्या त्वचेसाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. म्हणून पुरेशा प्रमाणात पाणी पिणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहते.
- मास्क : जास्त प्रयत्न न करता प्रवास करताना तुमच्या त्वचेला विशेष उपचार देण्यासाठी मास्क वापरा. यामुळे त्वचेला झटपट ग्लो आणि हायड्रेशन मिळतं.
- योग्य आहार आणि पुरेशी झोप : झोप आणि खाण्या-पिण्यामुळेही त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि तळलेलं किंवा खूप गोड खाऊ नका.
हेही वाचा :