रायपूर : शितला अष्टमीचा शूभ सण बुधवार १५ मार्चला देशभरात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी जेष्ठ नक्षत्र, सिद्धी योग, बलव आणि कौलव करण हे शुभ योग दिसत आहेत. त्यामुळे आजपासूनच खरमास सुरू होणार आहे. या दिवशी स्वयंपाकघरात अन्न शिजवले जात नाही. या दिवशी अन्नपूर्णा मातेला विश्रांती दिली जाते. शीतला सप्तमी म्हणजेच 1 दिवस आधी तयार केलेले अन्न शीतला अष्ठमीच्या दिवशी खाण्यात येते. हा सण उत्तर भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
शिळे अन्न खाण्याची आहे प्रथा : शीतला सप्तमीला तयार केलेले अन्न दुसऱ्या दिवशी शिळे 'बासा खाना' प्रसाद म्हणून खाल्ले जात असल्याची माहिती ज्योतिषी आणि वास्तुविशारद विनीत शर्मा यांनी दिली. शीतला सप्तमीच्या दिवशी घरात अन्न न बनवल्याने शीतला माता प्रसन्न होते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लहान मुलांना कांजण्या, तीव्र ताप, गोवर आदी आजारांपासून शीतला माता मुलांचे रक्षण करते अशी नागरिकांची श्रद्धा आहे. हा सण म्हणजे शीतला मातेच्या पूजेचा विशेष सण आहे. या दिवशी कुटुंबातील सगळे जण आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत शीतला मातेचे दर्शन घेतात. यावेळी शीतला मातेला पिवळे कपडे, पिवळी फुले, चंदन, रोळी, कुंकू, गुलाल, परिमल तसेच विविध प्रकारचा सिंदूर शीतला मातेला लावला जातो, असेही शर्मा यांनी यावेळी सांगितले.
मुलांच्या दीर्घायुष्यासाठी शीतला मातेची प्रार्थना : शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला मातेची प्रार्थना केल्यामुळे मुलांना दिर्घायुष्य लाभते. त्यामुळे माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी विधीपूर्वक शीतला मातेची पूजा करत असल्याची माहिती ज्योतिषी पंडित विनीत शर्मा यांनी दिली. या शुभ दिवशी शीतला मातेला अबीर गुलाल, चंदन आणि अक्षता अर्पण करण्यात येत असल्याचेही पंडीत शर्मा यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शीतला अष्टमीला माता आपल्या मुलांसह शीतला मातेचा आशीर्वाद घेतात.
माता अन्नपूर्णेला मिळते विश्रांती : शीतला अष्टमीला स्वयंपाक घरात प्रवेश केला जात नाही. त्यामुळे अगोदरच्या रात्रीच गृहिणी दुसऱ्या दिवसाचे भोजन बनवून घेतात. शीतला अष्टमीला अन्नपुर्णा मातेला अन्नपूर्णाला विश्रांती देण्याचा दिवस आहे. बिहारमध्ये हा पवित्र सण उत्साहात साजरा केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. बिहारमध्ये या दिवशी लोक एक दिवस आधी तयार केलेला भात आणि कढीचा प्रसाद खालला जातो. तर काही भाविक पकोड्यांचाही मनसोक्त आस्वाद घेत असल्याची माहिती पंडीत शर्मा यांनी यावेळी दिली आहे.
हेही वाचा - Holi 2023 : घरात बनवा या खास ५ डिश, तुमचा होळीचा सण होईल आणखी रंगीन