ETV Bharat / sukhibhava

जोडीदारासोबतच्या शारीरिक जवळकीने पुरुषांचे लैंगिक आरोग्य आणि प्रकृती चांगली राहते

प्रेमाच्या शारीरिक संबंधामुळे तुमचे नाते घट्ट होते. दुरावलेली मने सांधली जातात. पण तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहते. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले आहे की महिन्याला ६ – ८ वेळा सेक्स करणे सर्वसामान्य आहे. अर्थात याला काही मर्यादा नाहीत. तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा तुम्ही सेक्स करू शकता.

author img

By

Published : Aug 31, 2020, 1:18 PM IST

Physical Intimacy With Partner Can Improve Mens Sexual And Overall Health
जोडीदाराबरोबरच्या शारीरिक जवळकीने पुरुषांचे लैंगिक आरोग्य आणि प्रकृती चांगली राहते

पिडमॉन्ट हेल्थकेअर अटलांटा येथील यूरोलॉजिस्ट डॉ. निखिल शाह म्हणतात, 'तुमच्या जोडीदाराबरोबर शारीरिक जवळीक साधल्याने तुमचा तणाव कमी होतो. अस्वस्थता कमी होते. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ जाता. आणि अजून फायदा म्हणजे तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीचे आरोग्य आणि लैंगिक कार्य चांगले राहते.' aarp.org च्या अहवालानुसार सारखा सेक्स केल्याचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे –

  • रक्तदाब नियंत्रित राहतो – रक्तदाब वाढण्याची बरीच कारणे असतात. त्यात प्रचंड तणाव हे त्यातले एक कारण. आपली अनियमित जीवनशैली, व्यस्त दिनक्रम आणि कामाचे अनेक तास यामुळे रक्तदाब वाढतो. पण तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवलात, लैंगिक जीवन चांगले ठेवलेत तर वैद्यकीय मदत न घेता तुम्ही अनेक आरोग्य प्रश्न सोडवू शकता. AARP ने सांगितले आहे की, एका युरोपियन अभ्यासानुसार पुरुषांनी जास्त वेळा सेक्स केला तर त्यांचा रक्तदाब कमी होतो.
  • हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो – अनेकांना असे वाटते की वारंवार सेक्स केल्याने हृदयविकार बळावू शकतो आणि ज्या व्यक्ती फारशा शारीरिकदृष्ट्या कार्यरत नसतात, त्यांच्यासाठी हे खरे आहे. पण पुरुष नेहमीच्या आयुष्यात खूप कार्यरत असतात, त्यांचे हृदयाचे आरोग्य सेक्समुळे चांगले राहते. AARP ने सादर केलेल्या निरीक्षणात म्हटले आहे की, ब्रिटिश संशोधकांनी २० वर्षे ९१४ पुरुषांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळून आले की सेक्स करण्याचे प्रमाण वाढल्यावर हृदयविकाराचा धोकाही कमी झाला. 'मध्यम वयाच्या पुरुषाने हे लक्षात ठेवले पाहिजे की वारंवार सेक्स केल्याने हृदयरोग होण्यापासून संरक्षण मिळते.'
  • पुरुषांमध्ये इरेक्शन न होण्याचा धोका कमी होतो – फिनलंडच्या टॅम्पेर युनिव्हर्सिटीचे जुहा कोस्किमकी एमडी, पीएचडी यांनी सांगितले की जास्त वेळा सेक्स केला तर इरेक्शन न होण्याचा धोका कमी होतो. 'नियमित सेक्स केल्याने तुमची क्षमताही शाबूत राहते.' संशोधकांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की आठवड्यातून एकापेक्षाही कमी वेळा सेक्स केलात तर तुमची क्षमता कमी होईल.
  • प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता कमी होते – गेली आठ वर्षे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट ऑरगॅझम आणि प्रोस्टेट कर्करोग होण्याचे प्रमाण याचे संशोधन करत आहे. ४६ ते ८१ वयोगटातल्या २९,३४२ पुरुषांचा यासाठी अभ्यास केला. त्यात त्यांना हे आढळले की ऑरगॅझम वाढला की प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. २० व्या वर्षात ज्या पुरुषांचे महिन्यातून ७ वेळा वीर्यपतन झाले त्यांना प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका महिन्यातून २१ वेळा किंवा अधिक वीर्यपतन होणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे.

याशिवाय वारंवार सेक्स केल्याने तुम्ही तंदुरुस्त राहता. सेक्स हा असा व्यायाम आहे की ज्यामुळे १५० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तुमचा तणाव कमी होतो, उच्च रक्तदाब कमी होतो, तुम्हाला झोप चांगली लागते, परिणामी तुम्हाला चांगली विश्रांती मिळते.

थोडीशी अजून टिप – तुम्ही तुमचे नातेसंबंध टवटवीत ठेवा. तुमचे प्रेम तुमच्या जोडीदाराला जाणवू द्या. कामानंतर रोमान्सला वेळ द्या. नव्या गोष्टी अजमावा. तुमचे वैयक्तिक आणि सेक्स लाइफ कंटाळवाणे करू नका. रोमँटिक आणि नियमित सेक्स केल्याने परस्परातले बंध आणखी दृढ होताच आणि तुम्हाला भावनिक सुरक्षित वाटायला लागते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.