न्यूयॉर्क : कोरोनानंतर राज्यात मंकीपॉक्स आजाराने धुमाकूळ घातला होता. मंकीपॉक्स आजाराचे निदान करण्यासाठी चाचणी करण्यात मोठी अडचण होती. मात्र अमेरिकेतील संशोधकांनी मंकीपॉक्स आजारावर जलद चाचणी विकसित केल्याचा दावा केला आहे. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या मंकीपॉक्सला काही मिनिटात शोधण्यासाठी नॅनोकणांचा या चाचणीत वापर करण्यात येतो. सध्याच्या चाचण्यांमध्ये आरोग्य कर्मचारी स्वॅब घेऊन हे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतात. त्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होतो. मात्र या प्रक्रियेला बराच कालावधी जातो.
काही मिनिटात कळणार मंकीपॉक्स : मंकीपॉक्सचा आजार झाल्यानंतर त्याची चाचणी करणे मोठी अडचणींची ठरते. रुग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर तो चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतो. त्यानंतर त्याची चाचणी झाल्यानंतर अहवाल मिळायला बराच कालावधी यात जातो. मात्र पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नवीन चाचणी विकसित केली आहे. ही चाचणी नवीन निवडक आण्विक सेन्सर, पॉलिमरेझ चेन रिएक्शन (PCR) सारख्या कोणत्याही उच्च तंत्राचा वापर न करताही काही मिनिटात व्हायरस शोधू शकतो. अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स या जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशीत करण्यात आले आहे. अनुवांशिक नमुने शोधण्यासाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान तयार करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून वापरत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
सर्वात जलद चाचणी असल्याचा दावा : आम्ही विषाणूचे व्यवस्थापन कसे करतो या दृष्टीने ही एक मोठी प्रगती आहे. ही चाचणी मंकीपॉक्ससाठी पहिली जलद चाचणी असल्याचा दावा पेन स्टेट येथील नॅनोमेडिसिनचे प्राध्यापक आणि संशोधक दीपांजन पान यांनी केला. मंकीपॉक्स विषाणूंसाठी ही एक संवेदनशील शोध पद्धत विकसित करण्यात आली आहे. ही संकल्पना मंकीपॉक्ससारख्या विषाणूंवर देखील लागू करायची होती. या जलद न्यूक्लिक अॅसिड चाचणीची वास्तविक जागतिक पातळीवर निकड आहे. या तंत्रज्ञानाचा सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर लाक्षणिक परिणाम होईल, असेही पॅन यांनी यावेळी स्पष्ट केले.
महागड्या उपकरणांची चाचणीसाठी नाही गरज : अनुवांशिक अनुक्रमांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जाणार्या रेणूंमध्ये थोडासा बदल करण्यात येतो. त्यासह इतर विषाणू, जीवाणू किंवा बुरशी शोधण्यासाठी हीच पद्धत लागू केली जाऊ शकते. या तंत्रासाठी महागड्या उपकरणांची किंवा कुशल कर्मचार्यांची आवश्यकता नसल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. भविष्यातील उत्परिवर्तनासाठी ते तयार केले जाऊ शकत असल्याचा दावाही पॅन यांनी केला आहे. मंकीपॉक्स विषाणू प्रामुख्याने शारीरिक संपर्काद्वारे प्रसारित होतो. गंभीर असला तरी स्मॉलपॉक्स सारख्या लक्षणांसह हा आजार होतो. 2022 च्या मेपासून या विषाणूने 100 हून अधिक देशांमध्ये संसर्ग पसरवला आहे. जगभरातील अंदाजे एक तृतीयांश प्रकरणे अमेरिकेत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
हेही वाचा - World Liver Day 2023: आज जागतिक यकृत दिन; निरोगी जीवनासाठी यकृताची 'अशी' घ्या काळजी