मिठाचा वापर कमी करण्याचा सल्ला अनेक लोक देत असल्याचा तुम्हाला अनुभव आला असले. हा सल्ला यासाठी की, अती सोडियमचे सेवन उच्च रक्तदाबाशी संबंधित असते जो हृदयरोग, हृदयविकाराचा झटका आणि आघातासाठीचे एक प्रमुख जोखीमकारक घटक आहे.
म्हणून अलीकडील एक मथळा, 'खाने से जुडे मिथक टूटे : डेयरी, नमक और मांस का टुकडा संभवत: आपके लिए अच्छा है' ने अनेक लोकांचे लक्ष वेधले. या मथळ्याच्या आधारे, संशोधन लेखात सोडियमचे सेवन लक्षणीयरीत्या कमी करण्याच्या सल्ल्यामागे जोरदार तर्क आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. लेखाचा आधार असा आहे की, सोडियमचा वापर दररोज 2.3 ग्राम पर्यंत मर्यादित करण्याचा सध्याचा सल्ला बहुतेक लोकांना दीर्घकाळ अशक्य आहे. त्याचबरोबर, मिठाचे कमी सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक्स कमी होते, हे सिद्ध करणारे गुणवत्तापूर्ण पुरावे नाही, असा लेखाचा दावा आहे.
लेखकांचा असा सल्ला आहे की, वर्तमान जागतिक सोडियमचे सेवन जे दरदिवस 3-5 ग्राम पर्यंत असते, हृदयविकाराचा झटका, आघात किंवा अकाली मृत्यूच्या सर्वात कमी जोखमीशी संबंधित आहे. आणि हृदयविकाराचा झटका आणि मेंदू आघाताचा (stroke) धोका तेव्हाच वाढतो जेव्हा सोडियमचे प्रमाण यापेक्षा अधिक किंवा कमी असते.
मात्र, या दाव्यांवर अनेक वाद आहेत आणि मीठ वापर मर्यादित करण्याचा सध्याचा सल्ला जशाच्या तसाच आहे. या दाव्यांशी संबंधित काही मुद्द्यांबरोबरच संशोधकांद्वारे सुटलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया.
- एक चमचा मीठ जवळपास 5 ग्राम इतके असते आणि त्यात 2 ग्राम सोडियम असते.
- ऑस्ट्रेलियाचे नागरिक दरदिवशी जवळपास 3.6 ग्राम सोडियमचे सेवन करतात, जे 9.2 ग्राम (जवळपास 2 चमचा) टेबल सॉल्टच्या (किचनमध्ये वापरले जाणारे सामान्य मीठ) बरोबरीचे आहे. हे दर दिवशी 2 ग्राम सोडियम ( 5 ग्राम मीठ) हे शिफारस केलेले आहार लक्ष्य आणि एका दिवसांत 460-920 मिलीग्राम (1.3-2.6 ग्राम मीठ) पुरेसे प्रमाण यापेक्षा अधिक आहे.
- ऑस्ट्रेलियामधील सोडियमचे सेवन उर्वरित जगासारखेच आहे. जगातील प्रौढ लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश भाग असलेल्या 66 देशांच्या आकडेवारीनुसार, सरासरी सोडियमचे सेवन दरदिवशी 3.95 ग्राम असून ते दररोज 2.2 ते 5.5 ग्राम पर्यंत आहे.
होय, मिठाचे सेवन कमी करणे शक्य आहे
वैयक्तिक वर्तन बदलणे दीर्घकालीन आव्हानात्मक आहे. पण, ते शक्य आहे. आहारात मिठाच्या कमतरतेबाबत 2017 च्या पद्धतशीर पुनरावलोकनात असे आढळले की, वैयक्तिक आहार समुपदेशन एखाद्या व्यक्तीचे मिठाचे वापर दिवसातून सुमारे 2 ग्राम (780 मिलीग्राम सोडियमच्या बरोबरीचे) कमी करू शकते आणि हे कालांतराने पाच वर्षांपर्यंत असू शकते.
लोकसंख्या व्याप्त रणनीती ज्यात, कमी प्रमाणात मीठ वापरून तयार केलेले सुधारीत अन्न, चांगले लेबलिंग आणि काही क्षेत्रांत मास मीडिया शिक्षण अधिक प्रभावी होते, दरदिवशी सरासरी मिठाचे सेवन सुमारे 4 ग्राम कमी झाले जसे, फिनलँड आणि जापान.
कमी मीठ खाणे धोकादायक आहे का?
द्रवपदार्थांचे प्रमाण आणि पेशींची स्थिरता यासारख्या आवश्यक प्रक्रिया राखण्यासाठी मनुष्यांना सोडियमची आवश्यक्ता असते. आवश्यकतेपेक्षा जास्त सोडियम मुत्रातून बाहेर टाकले जाईल याची खात्री करण्यासाठी नर्व्ह, रासायनिक प्रक्रिया आणि संप्रेरकांची संवेदनशील प्रणाली या माध्यमांतून सोडियमची पातळी संतुलित राखली जाते.
जेव्हा सोडियमचे सेवन कमी असते तेव्हा हृदयाच्या आरोग्याबद्दल परस्परविरोधी पुरावे असतात. काही संशोधकांनी असे सुचवले आहे की, एक जे - आकाराचे नाते आहे, जेथे कमी आणि खूप जास्त सेवन केल्याने खराब परिणामांचा धोका वाढतो ('J' या आकाराचा शेवट). तर, सर्वात कमी धोका मीठ खाण्याच्या व्यापक मध्य बिंदूवर आहे ('J' मधील वक्र). तथापि, या संदर्भात असंख्य असमानता आहे, ज्यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी पुढील संशोधनाची आवश्यकता आहे. परंतु, जास्त मीठ खाण्याऐवजी कमी मीठ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो याची पुराव्यांमध्ये पुष्टी झाली आहे.
(पीटीआई)
हेही वाचा - सावधान..! 'ही' वागणूक वेळीच ओळखा, ईटिंग डिसॉर्डरचे असू शकते लक्षण