बाजरीचे पीठः आफ्रिकेत बाजरीचे पिक मानवाने लागवड करण्याअगोदरही कित्येक शतके अगोदर येत होते. बाजरी ही पोषक द्रव्यांच्या बाबतीत तर समृद्ध आहेच, परंतु ती थंड प्रदेशात, पडिक जमिनीतही चांगल्या प्रकारे वाढते आणि पेरणीच्या दिवसापासून सत्तर दिवसांच्या आत पिक कापणीला येते. आफ्रिका, आशिया आणि युरोपात बाजरीची मूलतः लागवड केली जात असली तरीही, जगभरातच बाजरी हा आहारातील मुख्य पदार्थ बनला आहे.
एक कपभर शिजवलेले बाजरीचे पीठ अंदाजे २०७ कॅलरीज शरिराला पुरवते. ६ ग्रॅम प्रोटिन, २ ग्रॅम आहारातील आवश्यक तंतुमय पदार्थ देते. शरिरातील चरबीचे प्रमाण २ ग्रॅमपेक्षाही कमी राखते तसेच अनेक खनिजे आणि जीवनसत्वेही बाजरी देत असते.
बाजरीच्या विविध पीठांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
रागी/नाचणी/
तुम्ही शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत रहाण्यासाठी आरोग्यदायी धान्याच्या शोधात असाल तर, रागी पिक हे अत्यंत चोख असा पर्याय आहे. रागी किंवा नाचणी याला फिंगर मिलेट (कणिस) असेही म्हटले जाते. कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन, थियामाईन आणि अमिनो असिडचे कोठार असलेले नाचणीचे पीठ हे एक आश्चर्यकारक असे धान्य आहे. नाचणीचे पीठ हे स्नायूंची कमजोरी दूर करते, रक्तक्षयावर उत्तम असून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते. चपाती, डोसा, कुकीज, बिस्किट बनवण्यासाठी नाचणीचे पीठ हे बहुतेक वेळा वापरले जाते. चपातीची चव आणि तिच्यातील आरोग्याचा अंश वाढवण्यासाठी गव्हाच्या पिठात सहसा नाचणीचे पीठ मिसळले जाते.
ज्वारी/कणिस
ज्वारीच्या पिठालाच कणिसही म्हटले जाते. अतिशय परिपूर्ण चव असलेल्या दाणेदार कणसाची चव खूप छान असते. जीवनसत्व बी १२, थियामाईन, जीवनसत्व अ, फॉस्फोरस, कॅल्शियम, प्रथिने आणि तंतुमय पदार्थांनी भरपूर समृद्ध असलेल्या ज्वारीच्या पीठामुळे, रक्तप्रवाह नियमित होतो, पेशींची वाढ होते आणि केसांचीही वाढ भरपूर होते. मधुमेहासाठी उत्तम असलेल्या ज्वारीच्या पिठामुळे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठापासूनही सुटका करते. गव्हाच्या पिठाला जो चिकटपणा असतो, त्यापासून ज्वारी ही नैसर्गिकरित्याच मुक्त असल्याने ज्या लोकांना गव्हाचे पीठ सहन होत नाही, त्यांच्यासाठी ज्वारी हा उत्तम पर्याय आहे.
मोती बाजरी/बाजरीचे पीठ
उच्च तपमान असलेल्या प्रदेशांमध्ये आढळणारे आणि दाणेदार बाजरीचे धान्य हे जीवनसत्वे आणि खनिजांचे जबरदस्त भांडार आहे. बाजरीच्या पीठालाच पर्ल मिलेट किंवा मोती बाजरी असे म्हटले जाते. प्रथिने, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फोरस आणि तंतुमय पदार्थांनी संपूर्ण भरलेले असे हे धान्य आहे. तसेच जीवनसत्व ई, जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स, नियासिन, थियामाईन आणि रायबोफ्लॅविन यांचाही समृद्ध असा स्त्रोत म्हणजे बाजरी आहे. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करत असल्याने ज्या लोकांना ह्रदयविकाराचा त्रास आहे अशांसाठी या पिठाचा आहारात समावेश करण्यासाठी शिफारस केली जाते. बाजरीचे पीठ हे काहीसे कोरडे असल्याने, बाजरीच्या भाकरीवर तूप लावल्यास ते उत्तम ठरेल.
अमरनाथ/राजगिरा पीठ
पाश्चिमात्य देशांमध्ये राजगिर्याला कडधान्य सदृष्य वर्गातील बीज मानले जाते. भारतात मात्र त्याला धान्य म्हणून कुणी मानत नाहि. त्यामुळेच, उपासाच्या दिवशी कडधान्यविरहित पदार्थच चालत असल्याने राजगिरा पिठाचे उपासाच्या दिवशी अगदी आदर्श पदार्थ म्हणून सेवन केले जाते. राजगिरा पीठही प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम आणि सी जीवनसत्वाचे कोठार आहे. ह्रदयविकार, कर्करोग आणि ह्रदयविकाराचा झटका यासारख्या दुर्धर आजारांना रोखण्यासाठी मदत करणारे म्हणून राजगिरा पीठ ओळखले जाते. संधिवातासारख्या दाह करणाऱ्या आजारांमध्येही उपचारांसाठी मदत करणारे म्हणून राजगिऱ्याचे महत्व आहे. बहुसंख्य भारतीय गृहिणी घरातच बाजरीचे पीठ बनवतात. बाजरीपासून पीठ बनवताना काही मुद्यांची नोंद करणे आवश्यक आहे.
बाजरीचे पीठ बनवण्यापूर्वी रात्रभर किंवा पाच ते सहा तास बाजरी भिजवून ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यातील फायटिक असिडचा प्रभाव नष्ट होईल आणि त्यातून एंझाईममुळे होणाऱ्या रासायनिक क्रियेला अटकाव करणारे द्रव्य पाझरायला सुरूवात होते. यामुळे पोषक पदार्थांचे पचन करण्याची प्रक्रिया सुलभ होते. भिजवल्यानंतर बाजरी धान्य सूर्यप्रकाशात सुकवायला हवे आणि एकदा संपूर्णपणे सुकल्यावर, त्याचे पीठ करण्यासाठी दळता येईल. बाजरीच्या पिठातील पोषक मूल्य वाढवण्यासाठी ताक किंवा दह्यात बाजरीचे पीठ भिजवण्याचाही एक मार्ग आहे. तंतुमय पदार्थ आणि पोषणविरोधी घटकांना अटकाव होण्यास या प्रक्रियेमुळे मदत होते. दही/ताक आणि बाजरीचे पीठ यांचा संयोग आतड्याचे आरोग्य सुधारण्यास तसेच अनेक आतड्याच्या किंवा पोटाच्या रोगांवर उपचारांमध्ये मदत करते. जसे हंगामात बदल होतात, त्याप्रमाणे बाजरीचे सहसा सेवन केले जावे. हिवाळ्यात अगदी आदर्श आहार म्हणजे कणिस आणि मोती बाजरी आहे तर ज्वारीची कणसे, बार्ली आणि बारीक बाजरीचे धान्य हे उन्हाळ्यातील उत्कृष्ट आहार आहे.
मुलांसाठीही बाजरी हे अत्यंत उपयुक्त
लहान मुलांसाठीही बाजरी हे अत्यंत उपयुक्त धान्य आहे कारण ते प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि तंतुमय पदार्धांनी समृद्ध आहे. प्रिबायोटिक असल्याने ते मुलांचे आतडे, पोट उत्तम स्थितीत राखते आणि मोठ्या आतड्यात पाण्याचे प्रमाण चांगले राखत असल्याने मुलांना बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवते. त्यातील मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण स्नायुंचा समन्वय उत्तम राखण्यास मदत करते आणि चेतासंस्थेच्या स्नायुंचे कार्य उत्तम राखते. बाजरीच्या धान्यात चिकटपणा नसला तरीही (ग्लुटेन फ्री) गॉयट्रोजन नावाचा पदार्थ त्यात असतो जो थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात ढवळाढवळ करतो. त्यामुळे बाजरीचे धान्य जास्त प्रमाणात सेवन केल्यास गॉयटर होण्याचा धोका असतो. तसेच, बहुतेक बाजरीच्या प्रकारांमध्ये प्रथिने आणि पोटॅशियमचे प्रमाण उच्च असल्याने, किडनी विकारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांनी डॉक्टर किंवा आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार,बाजरीचे सेवन केले पाहिजे.
काही शंका असल्यास -namaste@drkrutidhirwani.com वर संपर्क साधा.
हेही वाचा -प्रख्यात संगीतकार लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड