ETV Bharat / sukhibhava

"ड" जीवनसत्वासाठी किती वेळ सूर्यप्रकाशात थांबावे? सांगताहेत डॉ. पी.व्ही. रंगनायकुलू - world health day

सूर्यप्रकाशात थांबल्याने आरोग्याच्या दृष्टीने लाभ होतो, हे सूज्ञपणाचे आहे. त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आली तर हाडांची मजबुती आणि दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ड जीवनसत्व तयार होण्यासाठी त्याचा परिणाम होतो, असे अलीकडेच वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केले आहे. परंतु, जीवनसत्व ड प्राप्त करण्यासाठी आम्ही किती वेळ सूर्यप्रकाशात थांबले पाहिजे?

सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार
author img

By

Published : Apr 7, 2021, 12:24 PM IST

Updated : Apr 7, 2021, 1:34 PM IST

जागतिक आरोग्य दिन विशेष

ड जीवनसत्वासाठी आपल्याला किती वेळ सूर्यप्रकाशात थांबण्याची गरज आहे?
डॉ. पी.व्ही. रंगनायकुलू

सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचा त्वचेवर वर्षाव झाल्यावर, त्वचेला ज्या डिहायड्रोकोलेस्टेरॉलचा पुरेसा पुरवठा केलेला असतो. त्या ड जीवनसत्वात रूपांतर होते. हा पदार्थ त्वचा सोडून आत यकृतापर्यंत घुसतो. यकृत मग त्याचे रूपांतर डिहायड्रॉक्सीकोलेकॅल्सीफेरॉलमध्ये करते. आणि हे द्रव्य पुन्हा किडन्यांमध्ये जाते. आणि त्याचे परिपक्व ड जीवनसत्व बनते. यालाच वैद्यकीयशास्त्रात १,२५ डीएचसीसी किंवा डी ३ जीवनसत्व असे म्हटले जाते. हे जीवनसत्व आंत्रनलिकेतील कॅल्शियम शोषून घेण्याचे प्रमाण वाढवते. मलोत्सर्जनातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करते. आणि हाडांमधील कॅल्शियमचे अभिसरणही गतिमान करून रक्तातील कॅल्शियमचा स्तर सुदृढ राहिल, असे नियमित करते. या कॅल्शियमचे रक्तातील प्रमाण प्रति १०० एमएलमागे ९ मिलिग्रॅम असले पाहिजे. सूर्यप्रकाशाचा तुटवडा, यकृत आणि किडनीचे दुर्धर आजार यामुळे ड जीवनसत्वाच्या उपलब्धतेवर विपरित परिणाम होतो. हे ड जीवनसत्व निरोगी त्वचेसाठीही महत्वाचे असते. कारण ते अकाली वृद्धत्वाच्या खुणा दिसण्यापासून रोखते. एकंदर आरोग्य आणि चांगली शरिरप्रकृती या जीवनसत्वाच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतात. काही प्रकारच्या कर्करोगांनाही ते रोखते. त्यामुळे प्रत्येकाने पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्व मिळवले पाहिजे. काही जण प्रत्यक्ष बाहेर जाऊन काम करत असतात तर काही आत काम करतात. औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या उदयाबरोबर, बंद खोल्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना ड जीवनसत्वाची कमतरता जाणवते आहे. त्यामुळे, ड जीवनसत्वे पूरक प्रमाणात घेणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. ड जीवनसत्व हे चरबीचा साठा करणारे असून मशरूम, मासे, दुध आणि अंडी या पदार्थांमधून उपलब्ध होऊ शकते. तरीसुद्धा, अधिक प्रमाणात लोकांना ड जीवनसत्वाची कमतरता भासते आहे. पूरक ड जीवनसत्व हे एर्गोकॅल्सिफेरॉल या नावाने ओळखले जाते. आणि ते ह्दयास हानिकारक आहे. तसेच ते खूप जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृत आणि इलेक्ट्रोलाईट्सचे असंतुलन घडवून आणते. त्वचा जर १० मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत मध्यान्हीच्या उन्हाच्या संपर्कात आल्यास १००० आंतरराष्ट्रीय एकक(मोजण्याचे माप) इतके ड जीवनसत्व तयार होते. एका आठवड्यात दोन ते तीन तासात सूर्यप्रकाशात त्वचा रहाणे आवश्यक आहे. ज्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता भासणार नाही. प्रखर प्रकाशात बसले तरीही ड जीवनसत्व तयार होण्यास मदत होते. लहानपणी हाडांचा मऊपणा ज्याला मुडदूस या नावाने ओळखले जाते आणि प्रौढावस्थेत ऑस्टिओमलाशिया ज्या आजारात हाडांची रचनाच विद्रूप होत असते, हे आजारही ड जीवनसत्वाच्या अभावानेच होतात. ऑस्टिओपोरोसिस किंवा ठिसूळ हाडे यांचा धोका या अवस्थेत असतो. अनेक प्रौढ व्यक्ती जेव्हा पडतात. तेव्हा त्यांचे हाड मोडल्याचा अनुभव नेहमीचा आहे. ही सारी बिकट अवस्था पूरक ड जीवनसत्व किंवा स्वतः सूर्यप्रकाशात राहून ड जीवनसत्व तयार करण्याने रोखली जाऊ शकते. दररोज किमान दहा मिनिटे सूर्यप्रकाशात जाऊन थांबणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्या त्वचेचा रंग गडद आहे, त्यांनी यापेक्षा दुप्पट कालावधीपर्यंत उन्हात थांबणे आवश्यक आहे. शक्यतो उन्हात थांबताना पायांपर्यंत येणारी पॅंट न घालता शॉर्ट्स परिधान करावेत आणि लांब बाहीचे शर्ट घालणे टाळावे. आपल्या घराच्या आसपास सकाळी भटकण्यासाठी थोडीशी जागा असणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाशात जास्त वेळ थांबल्यास, आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पण त्यासाठी त्वचा काळी पडण्याचा धोका स्विकारावा लागेल. कॅल्शियम चयापचय प्रक्रियेतच ड जीवनसत्व उपयुक्त आहे. नैराश्य दूर करून आपल्याला आनंदी ठेवणारे मेंदूतील सिरोटोनिन रसायन स्त्राव वाढवण्यासही मदत करते. भूक नियमित करून वजन संतुलित राखण्यासाठी आवश्यक असलेल्या लेप्टिन या हार्मोनलाही ड जीवनसत्व नियंत्रित करत असते.

Last Updated : Apr 7, 2021, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.