मधुमेह चयापचयाशी रोगांचा एक गट आहे. वेळेवर उपचार न केल्यास विविध प्रकारच्या गुंतागुंत होऊ शकतात. आयुर्वेदात मधुमेहासाठी विविध प्रकारचे उपचार आहेत.
आयुर्वेदाचे उपाय ठरणार प्रभावी
आयुर्वेदात असंतुलित जीवनशैली, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, कमी शारीरिक श्रम, जास्त ताण इत्यादी मधुमेहाची कारणे सांगितले आहे. आयुर्वेदाशी संबंधित शास्त्रात असेही सांगितले गेले आहे की, या सर्व कारणांमुळे त्या व्यक्तीचे वात, पित्त आणि कफ यांचे असंतुलन होते आणि मधुमेह वाढते. मधुमेहाच्या तिन्ही दोषांमध्ये असंतुलन दिसून येत असले तरी मुख्यतः कफचा होणारा परिणाम हे त्याचे मूळ कारण मानले जाते. याव्यतिरिक्त मधुमेह हा अनुवांशिक विकार देखील मानला जातो. आयुर्वेदात मधुमेहाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभव'ने हैदराबादमधील वरिष्ठ आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. पी.व्ही रंगनायकुलू यांच्याशी संवाद साधला आणि मधुमेहासाठी काही सामान्य उपाय आणि रोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणाऱ्या औषधांबद्दलची चर्चा केली.
मधुमेह होण्याची कारणे -
स्वादुपिंडात निरनिराळ्या संप्रेरकांचे उत्पादन आणि स्त्राव होते. ज्यास आपल्या शरीराच्या पाचक प्रणालीचा मुख्य भाग मानले जाते. यापैकी मुख्य म्हणजे इन्सुलिन आणि ग्लूकन. इन्सुलिन आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, जे आपल्या रक्तातील साखरेचे उत्पादन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी कार्य करते. परंतु जर काही कारणास्तव इन्सुलिनचे उत्पादन कमी होत असेल तर पेशींच्या उर्जेबरोबरच वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. अशास्थितीत, व्यक्तीस सामान्यत: अशक्त होणे आणि ह्रदयविकाराचा झटका यासारख्या समस्या जाणवू लागतात. इन्सुलिनचे कमी उत्पादन झाल्यामुळे रक्तातील साखर वाढते जी शरीराबाहेर मूत्रमार्गे जाते. मधुमेहाच्या पेशंटला वारंवार लघवी होणे हेच कारण आहे. मधुमेहासाठी विविध घटक जबाबदार असल्याचे मानले जाते. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
- आनुवंशिकता : जर कुटुंबातील कोण्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याचा धोका त्यांच्या मुलांना, नातवंडाना होऊ शकतो.
- लठ्ठपणा : लठ्ठपणा देखील मधुमेहासाठी जबाबदार आहे. वेळेवर अन्न न खाणे किंवा जास्त जंक फूड किंवा असंतुलित आणि आरोग्यदायी अन्न न खाल्याने वजन वाढते. त्यामुळे कधीकधी उच्च रक्तदाब येते आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढते आणि मधुमेह होऊ शकतो.
डॉ. पी.व्ही रंगनायकुलू म्हणतात की, सध्या मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाणही खूप वाढत आहे. मुख्य कारण म्हणजे त्यांची शारीरिक निष्क्रियता, अन्नामध्ये असंतुलन, बर्याच काळासाठी टीव्ही. किंवा व्हिडिओ गेम खेळण्यात वेळ घालविण्याच्या सवयींचा हा दुष्परिणाम आहे.
आयुर्वेदाचे घरगुती उपचार
डॉ. पी.व्ही रंगनायकुलू स्पष्ट करतात की, मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांचे वय कितीही असले तरी नियमितपणे रक्तातील साखरेची पातळी तपासून पहावी. पीडित व्यक्ती इन्सुलिनवर अवलंबून नसल्यास, नियमित उपचाराबरोबरच खाली सूचीबद्ध काही घरगुती उपचारांचा उपयोग ते करू शकतात.
- दिवसातून एकदा 1 ग्रॅम कडुलिंबाच्या पानांचा पाला मधाबरोबर घ्या.
- दिवसातून एकवेळा 20 मिलीलीटर इतका कडूलिंबाचा पालाचा रस प्या.
- गिलोयचा एक छोटा तुकडा बारीक करा आणि त्याचा रस काढा. दिवसातून एकदा 2 चमचा घ्या.
- आवळ्याचा चूर्ण हळदीत मिसळवून दिवसातून एक वेळा पाण्यासोबत घ्या.
- जांभुळ फळाच्या बियांना कोरडे करून पावडर बनवा. दिवसातून दोनदा 500 मिलीग्राम पाण्यात मिसळवून घ्या.
- दिवसातून दोनदा भारतीय किनो ट्री (बिजका) ची 20 मिलीलीटर इतका काढा घ्या.
हे घरगुती उपचार मधुमेहासाठी एक व्यापक उपचार असू शकत नाहीत. परंतु या घरगुती उपचारांमुळे रोगाची तीव्रता कमी होईल.