ETV Bharat / sukhibhava

Holi Festival 2023 : होळीत अशी घ्या आरोग्याची काळजी, सण होईल आनंदात साजरा - होळीचा रंग

होळीचा सण तरुणांसह लहान-थोर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र होळीत लहान मुलांसह ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाने नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत केल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ लवकर आजारी पडतात. त्यासाठी लहान मुलांची आणि ज्येष्ठांची होळीत काळजी कशी घ्यावी याबाबतची ही खास माहिती.

Holi Festival 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 7, 2023, 11:16 AM IST

हैदराबाद : होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि जीवनात रंग भरण्याचा दिवस आहे. त्यामुळे लहान थोर मंडळी या सणात उत्साहाने सहभागी होत रंगाची उधळण करतात. मात्र रंग खेळताना लहान थोर मंडळीच्या आरोग्याची काळजी घेतली तरच होळी सण आनंदात साजरा करता येतो. अन्यथा विविध आजारांचा सामना कारावा लागण्याची शक्यता आहे. तुमची होळी आनंदात साजरी करण्यासाठी खास तुमच्यासाठी आम्ही देत आहोत आरोग्याच्या काही टीप्स.

रंग खेळताना होतो आरोग्यावर विपरित परिणाम : होळीचा रंग खेळताना अनेकदा रंगाचे विपरित परिणाम त्वचेवर होतात. त्यामुळे सावधानता राखूनच होळी हा सण साजरा करणे गरजेचे आहे. होळीचा जल्लोष मनाला खूप सुखावतो मात्र अनेकवेळा या आनंदावर विरजण पडते. रंग खेळण्याच्या उत्साहात खाण्याबाबत निष्काळजीपणा होतो. त्याचाही आरोग्यावर विपरित परिणाम होतो. होळीच्या दिवशी नागरिक एकमेकांना रंग लावतात. एकमेकांच्या घरी जातात आणि चाट, पकोडे, तळलेले पदार्थ, भांग, मद्यासह इतर प्रकारच्या पदार्थांचा आनंद घेतात.

होळी खेळताना काळजी घेणे गरजेचे : मात्र होळीनंतर रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढते. या रुग्णांमध्ये लहान मुले आणि वडिलधाऱ्यांचाही समावेश असतो. याबाबत भोपाळचे जनरल फिजिशियन डॉ. राजेश शर्मा यांनी होळीनंतर सहसा त्वचा, श्वसन, पचन किंवा पोटात संसर्गासारख्या आजाराने नागरिक त्रस्त होतात. होळीच्या काळातच हवामानातील सततच्या बदलामुळे सर्दी ताप आदी संसर्गानेही नागरिक आजारी पडतात. त्यामुळे होळीचा सण सावधगिरीने साजरा करणे खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लहान मुलांची अशी घ्या काळजी : होळीच्या सणात लहान मुलांना रंग खेळण्यापासून रोखणे अत्यंत कठीण काम आहे. होळीच्या एक आठवडा आधी मुले रंग, पिचकारी आणि फुगे घेऊन होळी खेळायला सुरू होतात. त्यामुळे रंगीत आणि घाणेरड्या पाण्यात खेळताना त्यांना भूक लागल्यावर ते हात न धुता काहीही खातात. त्यामुळे अन्नासोबत रंग त्यांच्या पोटात जाण्याची शक्यता असते. त्याचवेळी संसर्ग करणारे जंतूही त्यांच्या पोटात जाऊन त्यांना आजारी करतात. त्यामुळे होळीनंतर लहान मुलांमध्ये पोटाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे डॉ राजेश शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी होळीत वातावरण बदलत आहे.

कोरोनामुळे झाली प्रतिकारशक्ती कमकुवत : बदलत्या हवामानामुळे मुलांमध्ये सर्दी किंवा फ्लूचा संसर्ग वाढला आहे. तर दुसरीकडे कोविड 19 मुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे त्यांच्या वारंवार आजारी पडण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजे असल्याचेही डॉ शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे होळी सणाच्या वेळी निष्काळजीपणा केल्याने मुलांच्या आजारी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यांना अपचनाची त्रास होतो. त्यासाठी पालकांनी सणादरम्यान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. होळी खेळताना मुलांच्या आरोग्याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मुलांच्या आरोग्याची कशी घ्यावी खबरदारी :

  • आहाराची विशेष काळजी घ्या. शक्यतो त्याला फक्त घरी बनवलेले पदार्थ खायला द्या.
  • घाणेरड्या हातांनी काहीही खाणे टाळण्याबाबत मुलांना समजावून सांगा काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुण्याबाबत सूचना द्या.
  • मुलांना थंड पेय, बाजारातील चिप्स, प्रक्रिया केलेले आणि जास्त मीठ किंवा गोड पदार्थ देणे टाळा. त्याऐवजी फळे, ड्रायफ्रुट्स, ताज्या फळांचे रस, नारळपाणी असे पदार्थ त्यांच्या आहारात वाढवा.
  • केमीकलयुक्त रंगांचा वापर, स्प्रेअरमधील थंड पाण्याचा वापर आणि फुग्यांसह होळी खेळण्यामुळे होणारे नुकसान मुलांना समजावून सांगा आणि त्यांचा वापर टाळण्यास प्रवृत्त करा.
  • होळीच्या दिवशी मुलांना तेलाने मसाज केल्यावर त्यांना केस आणि शरीराचा बराचसा भाग झाकून ठेवतील असे कपडे घालावेत. त्यामुळे त्यांची त्वचा रंगांच्या थेट प्रभावाखाली येण्यापासून वाचवेल.
  • शक्यतो मुलांना ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू देऊ नका.

कोरोनामुळे वाढले नागरिकांमध्ये आजार : होळीच्या दिवशी केवळ लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. होळीनंतर त्वचा, पचनसंस्थेशी संबंधित, ताप अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्येष्ठांमध्येही पाहायला मिळतात. त्याचबरोबर होळीनंतर दारू किंवा इतर प्रकारच्या नशेमुळे रस्ते अपघात किंवा जखमी होण्याच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ होते. डॉ राजेश शर्मा यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने आधी कोविड 19 चे बळी झालेले रुग्ण मोठ्या संख्येत येत असल्याची माहिती दिली. कोविडच्या दुष्परिणाम आणि इतर अनेक कारणांमुळे कोलेस्टेरॉल वाढणे, हृदय गती वाढणे, वेगवान श्वासोच्छवासाचा नागरिकांना त्रास होत आहे. अधिक अशक्त वाटणे, पचन समस्या, श्वसन समस्या आणि वारंवार आजारी पडणे यासारख्या समस्याही नागरिकांना होत आहे. रंगांची उधळण आणि आहारातील निष्काळजीपणा या लोकांसाठी संसर्गाचे बळी ठरू नये, म्हणून आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आणि खबरदारी घेण्याची गरज आहे.

कशी घ्यावी ज्येष्ठांनी खबरदारी :

  • केमीकलच्या रंगामुळे श्वसन आणि त्वचेची अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे केमीकलचे रंग वापरणे टाळावे.
  • ज्यांना श्वासोच्छवासाची किंवा अ‍ॅलर्जी आहे त्यांनी हवेत गुलाल किवा रंग जास्त असलेल्या ठिकाणापासून दूर राहावे.
  • होळीच्या दिवशी खाण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. होळीत सर्वत्र फक्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ दिले जातात. अशा परिस्थितीत या प्रकारच्या आहाराच्या अतिप्रमाणामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात.
  • मधुमेह, हृदयाशी संबंधित किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी सणासुदीत आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.

होळीत नशेपासून दूर राहणे आवश्यक : होळीमध्ये केवळ आहार आणि रंगांशी संबंधित खबरदारी घेणे आवश्यक नाही तर दारू, भांग किंवा कोणत्याही प्रकारची नशा यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. ही सवय काही क्षणांसाठी आनंदाचे कारण बनू शकते, परंतु यामुळे शरीराचे खूप नुकसान होते. अनेक वेळा अपघाताचे कारण देखील बनते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याची माहिती डॉ राजेश शर्मा यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.