हैदराबाद - हायपोक्सिया ही कल्पना इतकी गोंधळात टाकणारी आहे की जगभरातले तज्ज्ञ त्याला सैद्धांतिकदृष्ट्या जीवशास्त्राचा नाश करणारी घटना म्हणत आहेत. ते अशक्य असले पाहिजे, तरीही त्याचे नाव 'हॅपी हायपोक्सिया' हे आहे.
हॅपी हायपॉक्सिमिया (हायपोक्सिया)
रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी ९० टक्क्यांपेक्षा कमी असणे, म्हणजे ती खूप कमी समजली जाते. ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो आणि छातीत दुखते. पण हॅपी हायपोक्सियामध्ये अशी काही लक्षणे दिसत नाहीत.
- कोविड १९ मध्ये रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटर वापरले जाते. न्युमोनिया झाला असेल तर रक्तातला ऑक्सिजन कमी होतो. तसेच फुफ्फुसात द्रवसंचय होतो आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढते. यामुळे रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी कमी होण्याऐवजी श्वास घ्यायला त्रास होतो.
- हायपोक्सिमियाची तपासणी न केल्यास हायपोक्सियाची (ऑक्सिजन टिश्यूंची पातळी कमी होते ) म्हणतात ज्यामुळे अवयवांचे नुकसान होऊ शकते.
- रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो
- रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि ते फक्त त्यालाच जाणवते. त्याच्या आजूबाजूला असलेल्या इतरांना नाही.
- रुग्ण जोपर्यंत जोरजोरात श्वाच्छोश्वास, हृदयाची जलद धडधड किंवा या स्थितीशी निगडीत अशी लक्षणे दाखवत नाही, तोपर्यंत आरोग्य सेवकांनाही रुग्णाची ही अवस्था कळत नाही.
- आपले शरीर ज्या प्रकारे हायपोक्सियाला प्रतिसाद देते, त्यामुळे ताप येऊ शकतो – ताप हा कोविड १९ च्या लक्षणापैकी एक. हॅपी हायपोक्सियामध्येही तो येऊ शकतो.
- हायपोक्सियामध्ये मधुमेह आणि जास्त वय प्रतिसाद कमी करते. असे लक्षात आले आहे की मधुमेह आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर हायपोक्सियाला कमी प्रतिसाद मिळतो. अभ्यासावरून हे जाणवले आहे की, कोविड १९ झालेल्या अशा रुग्णांना मूक हायपोक्सिया होण्याची शक्यता असते. हेही लक्षात आले आहे की, अनेक व्यक्तींमध्ये हा वेगवेगळा असतो. म्हणजे एखाद्या रुग्णामध्ये श्वास घ्यायला त्रास होणे, कार्बन डायऑक्साइडची पातळी जास्त असणे ही लक्षणे ताबडतोब दिसतात. तर दुसऱ्या एखाद्या रुग्णात अशी लक्षणे आढळत नाहीत.
- गेल्या काही आठवड्यांत अनेक आरोग्य सेवकांचा रुग्णांची लक्षणे पाहून संभ्रम वाढला आहे. ते म्हणतात, या रुग्णांमध्ये आरोग्य सुधारण्याची लक्षणे दिसतात आणि अचानक ते वेगाने कोसळतात. इतके की काही मदत करण्याची संधीच मिळत नाही. काही रुग्णांना तर श्वसनाचा काही त्रास जाणवतही नाही. असे रुग्ण ऑक्सिजनची कमी पातळी असूनही असामान्य प्रतिसाद दाखवतात. म्हणूनच हॅपी हायपोक्सिया डॉक्टरांसाठीही अजून अनभिज्ञ क्षेत्र आहे.
हायपोक्सिया आणि होमियोपॅथी
होमिओपॅथीमध्ये हायपोक्सियावर बरीच औषधे दिली आहेत. माझ्या व्यावहारिक अनुभवाप्रमाणे अमोन कार्ब., ऑरम मेट., कॅक्टस ग्रँड., कार्बो वेज., कम्फोरा, इग्नाटिया अमारा, लाचेसिस, स्टेफिसाग्रिया इत्यादी काही महत्वाची औषधे आहेत. वेळेवर औषधे घेतली तर आणीबाणीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा ही औषधे चमत्कार करतात. कोविड १९ मुळे हायपोक्सिया झाला तर या औषधांमुळे ऑक्सिजनशिवाय तीन तासात आराम मिळू शकतो. कॅम्फोरा १ M चा परिणाम अगदी चमत्कार आहे. PaO2 ८५ पर्यंत गेले आणि अगदी ४५ मिनिटात ऑक्सिजनची पातळी ९५ च्या वर गेली.
अधिक माहितीसाठी डॉ. ए. के. अरुण docarun2@gmail.com इथे संपर्क साधा.