ETV Bharat / sukhibhava

तुम्हाला हाईपरअॅसिडिटी आहे का? डॉक्टरने सांगितला 'हा' उपचार - Acidity treatment

आयुर्वेदानुसार आम्लता (acidity) जी एक जठरासंबंधी समस्या आहे ती पित्त दोशामुळे होते. जेव्हा एका व्यक्तीला आम्लता होते तेव्हा त्याला आंबट ढेकर, घशात अन्न अडकल्याचा अनुभव होतो. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉ. पी.व्ही. रंगनायकुलू यांनी अॅसिड रिफ्लक्स (acid reflux) किंवा आम्लपित्तपासून (hyperacidity) मुक्तता मिळवण्यासाठी काही उपाय सूचवले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 20, 2021, 8:45 PM IST

Updated : Jul 20, 2021, 9:03 PM IST

आयुर्वेदानुसार दोशामध्ये (doshas/humor) असंतुलनाने विविध आजार होतात. वात, पित्त, आणि कफ या कोणताही एका दोशात वाढ किंवा घट झाल्यास आजार होतो. पित्त दोश वाढल्याने आम्लपित्त (hyperacidity) किंवा अॅसिडिटी होते. त्याला कसे नियंत्रणात ठेवता येईल, त्याची चिन्हे, लक्षणे आणि उपाय काय आहेत? याबाबत 'ईटीव्ही भारत सुखीभवने' डॉ. पी.व्ही रंगनायकुलू यांच्यापासून जाणून घेतले.

आम्लपित्त (hyperacidity) किंवा अॅसिड रिफ्लक्स

आयोग्य आहार हे आम्लता (acidity) होण्यामागचे मुख्य कारण आहे, असे मत डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी व्यक्त केले. आजच्या काळात आम्लता ही तरुण आणि वृद्ध सर्वांना भेडसवणारी सर्वात सामान्य समस्या आहे. अगदी काही मुले देखील अॅसिड रिफ्लक्सच्या समस्यनेने ग्रस्त आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जवजवळ 70 टक्के लोकसंख्या ही आम्लतेने (acidity) प्रभावित आहे, अशी माहिती डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी दिली.

पचनक्रिया होत असताना जेवनाचे छोटे तुकडे होतात. हे तुकडे अन्ननलिकेतील (esophagus) हायड्रोक्लोरिक आम्लच्या (hydrochloride acid) अॅसिड लेअरमधून पार होतात. त्यामुळे, पोटात आणि छातीत जळजळ होण्यास सुरुवात होते. पोटातील म्युकस (श्लेष्मा सारखा चिकट पदार्थ) हा अॅसिडला डाईल्यूट (सौम्य) करतो, यामुळे पोटात दाह होत नाही. जेव्हा पोटात जास्त हायड्रोक्लोरिक अम्ल असते किंवा श्लेष्माचे (mucus) स्त्राव करणारे सेल लाईनींग खराब होतात तेव्हा व्यक्तीला पोटात जळजळ वाटायला लागते. तीव्र अम्लतेला (Acute acidity गॅस्ट्रोइसोफाजिएल रिफ्लक्स (GERD- Gastroesophageal reflux) आजार देखील म्हणतात.

गॅस्ट्रोइसोफाजिएल रिफ्लक्स हे पोटात कमी अम्ल असणे (low stomach acid), मॅग्नेशियम कमतरता, काही पदार्थ, सवयी, हर्निया आणि लवकर जेवण करणे यामुळे होते. लिंबूवर्गीय पदार्थ (citrus foods), दारू, मसालेदार पदार्थ, पेपरमिंट अशी पदार्थ खाणे टाळल्यास आराम मिळू शकतो. मनापासून खाण्याचा प्रयत्न करा, तसेच 20 ते 30 वेळा चाऊन खा, असा सल्ला डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी दिला.

आम्लपित्ताची (hyperacidity) कारणे

आम्लपित्त होण्याची बरीच कारणे आहेत, त्यापैकी प्रामुख्याने जी कारणे आहेत ती पुढील प्रमाणे,

1) तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे.

2) आम्लता (acidity) घडवणारे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणे.

3) अयोग्य किंवा अपुरी झोप.

4) बरेच तास उपाशी राहणे.

5) बरेच कालावधी पेन किलरचे सेवन करणे.

6) गरोदर असतानाही महिलांना आम्लतेचा अनुभव होतो.

7) जास्त प्रमाणात मीठ खाणे.

8) जास्त प्रमाणात दारू आणि कॅफिनचे सेवन केल्यानेही आम्लता होऊ शकते.

9) जास्त जेवन करणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे.

10) अत्यधिक धुम्रपान किंवा तंबाखूचे सेवन.

11) अत्यंत ताण किंवा मानसिक ताणाने अपचणाची समस्या निर्माण होऊन ते आम्लता होण्याचे कारण ठरू शकते.

आम्लतेची (acidity) चिन्हे आणि लक्षणे

गॅस आणि पोटात जळजळ ही आम्लतेची सामान्य लक्षणे आहेत. या दोन व्यतरिक्त इतर लक्षणे पुढील प्रमाणे आहेत,

1) जेवल्यानंतर बराच वेळ छातीत जळजळ (heart burn) होणे.

2) जेवल्यानंतर बराच वेळ आंबट ढेकर आणि घशात अन्न अडकल्याचा अनुभव.

3) जास्त ढेकर (excess burping) देणे आणि तोंडात कडू वाटणे.

4) पोट फुगणे.

5) तोंडातून दुर्गंध येणे.

6) पोटात आणि डोक्यात वेदना होणे.

उपचार

डॉ. रंगनायकुलू सांगतात, आम्लता (acidity) ही एक अशी समस्या आहे जी बरीच महिने, वर्ष राहू शकते. काही आयुर्वेदिक गृहोपचार आम्लतेपासून आराम देऊ शकतात, ते पुढील प्रमाणे आहेत,

1) गरम पाण्यात ज्येष्ठमधचे (liquorice) पावडर गरम करून जेष्ठमधचा काढा (liquorice decoction) बनवा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाअगोदर 10-15 एमएल हा काढा प्या.

2) जीरा आणि धणेच्या बिया एकत्र प्रमाणात घेऊत ते 4 पट पाण्यात 15 मिनिटे उकळा. त्यानंतर काढ्याला गाळा (filter) आणि त्यात थोडे तूप टाकून दिवसातून दोनदा 30 एमएल सेवन करा.

3) कोरडी आले पूड किंचित तळून घ्या. ते अर्धा चम्मच घ्या आणि त्यात 1 चम्मच साखर टाकून त्यास सकाळी नाशत्याच्या अगोदर खा.

आम्लपित्त (hyperacidity) हे जिवाणू संसर्गामुळे (bacterial infection) देखील होऊ शकतो, त्यामुळे उपचारात अचूकतेसाठी तपासणी केली पाहिजे, अशी माहितीही डॉ.पी.व्ही रंगनायकुलू यांनी दिली.

Last Updated : Jul 20, 2021, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.