हैदराबाद : Egg Benefits For Hair साधारणपणे लोक नाश्त्यात अंडी खातात, ऑम्लेट, भुर्जी, सँडविच आणि इतर अनेक पदार्थ त्यापासून बनवले जातात. त्यात असे अनेक पोषक तत्व आढळतात, जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात, परंतु तुम्हाला माहित आहे का, प्रोटीनयुक्त अंडी केसांना निरोगी ठेवतात. यामुळे तुमच्या केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. जर तुम्ही तुमच्या केसांच्या निगा राखण्याच्या दिनचर्येत अंडी समाविष्ट केलीत तर तुमचे केस रेशमी आणि चमकदार होतील. चला तर मग जाणून घेऊया, केसांवर अंडी लावण्याचे फायदे आणि त्यापासून मास्क बनवण्याची पद्धत.
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त : प्रथिनेयुक्त अंडी तुमच्या टाळूचं पोषण करतात. अंड्यातील पिवळा बलक आणि पांढऱ्या रंगानं केसांना मसाज करू शकता. यामुळे तुमचे केस जलद वाढतील. केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा अंडी टाळूवर लावू शकता, यामुळे केस गळणंही नियंत्रणात येईल.
केसांचं नुकसान होण्यापासून संरक्षण करा : बदलत्या ऋतूत अनेकदा केस खूप खडबडीत आणि निस्तेज होतात. अंड्यांमध्ये नैसर्गिक केराटिनसह प्रोटीन असते जे केसांना नुकसान होण्यापासून वाचवते. यासाठी अंड्याच्या पांढऱ्यामध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल आणि खोबरेल तेल मिसळा. केसांना लावा, काही वेळानं धुवा.
केसांना मॉईश्चराईज : कोरड्या स्कॅल्पची समस्या असलेल्या लोकांसाठी अंडी खूप फायदेशीर ठरू शकतात. केसांचा मास्क तयार करण्यासाठी, एका भांड्यात अंडी फोडा, ते चांगले फेटून घ्या. आता त्यात एक किंवा दोन चमचे एरंडेल तेल मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावा, अर्ध्या तासानंतर शॅम्पूनं धुवा.
कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त : हा कंडिशनिंग हेअर मास्क आहे, ज्याचा वापर करुन तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. हा मास्क तयार करण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात एक संपूर्ण अंडं फेटावं लागेल, आता त्यात 1 चमचा लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर लावा, सुमारे 20 मिनिटांनी पाण्यानं धुवा.
हेही वाचा :