नवी दिल्ली : लठ्ठपणा हा एक आजार नसून जीवनशैलीचा विकार आहे. आपण काय खातो आणि किती व्यायाम करतो याबाबत आपण केलेल्या निवडीतून लठ्ठपणा उद्भवतो. मात्र तो कमी करण्यासाठी आव्हान अलिकडच्या वर्षांत वेगाने विकसित होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 50 वर्षांपूर्वी लठ्ठपणा हा कोणताही आजार नव्हता. त्यावेळेस व्यक्ती अधिक सक्रिय जीवन जगत होते. सध्या आपल्याकडे असलेल्या उच्चकॅलरी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांला घरात प्रवेश नव्हता. त्यामुळे लठ्ठपणा नागरिकांना होत नसल्याचे दिसून येत होते.
काय आहेत कारणे : आताची पीढी ही शारीरिक काम न करत नसल्याने अधिकाधिक सुस्त झाली आहे. त्यामुळे लठ्ठपणाच्या दरात लक्षणीय वाढ झाली. त्यातही अवेळी खाण्याच्या सवयीनेही लठ्ठपणा आणखी वाढत आहे. आपण घेत असलेले जेवण त्याच्या पौष्टिक मूल्यांबद्दल पुरेशी जागरूकता नाही. व्यक्ती सहसा त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार न करता जेवण करतात. त्यामुळे लठ्ठपणाला आमंत्रण दिले जाते. आपण वारंवार शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेतो. परिणामी वजन वाढून हळूहळू लठ्ठपणा येतो. आपली सध्याची जीवनशैली आणि लठ्ठपणा आपल्या आरोग्यासमोरील महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत. मात्र आपल्या दैनंदिन जीवनात सोप्या सवयींचे पालन करून त्यावर मात करता येते.
पौष्टिक आहार घ्या : लठ्ठपणामुळे व्यक्तीला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यांमुळे आपण पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. आहारात कॅलरीचे प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे आहे. अर्थात आपल्या शारीरिक हालचालींच्या प्रमाणात कॅलरिजचे घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण अधिक सक्रिय जीवन जगले पाहिजे. त्यासह पौष्टिक आहार घेणेही गरजेचे आहे. चांगले पोषण आणि नियमित व्यायाम यावर आपला भर असला पाहिजे. यापैकी कोणत्याही एकाकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक उद्दिष्ट : लठ्ठपणा आल्यानंतर बहुतेक नागरिक लिपोसक्शन सारख्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांचा पर्याय निवडतात. मात्र त्याऐवजी नैसर्गिक वजन कमी करण्याच्या धोरणांवर भर दिला पाहिजे. या शस्त्रक्रियांचे तात्पुरते परिणाम मिळू शकतात. मात्र दीर्घकाळासाठी ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आपण वजन कमी करण्याच्या टिकाऊ आणि निरोगी तंत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
करा शाश्वत बदल : लठ्ठपणा आलेल्या व्यक्तीला सतत आपल्या वजन कमी करण्याची चिंता सतावत राहते. मात्र त्यासाठी निरोगी जीवनाचे महत्त्व जाणून घेणे महत्वाचे असते. आपण खात असलेल्या अन्नाच्या पौष्टिक मूल्यांबद्दल जागरूक असले पाहिजे. आपल्या निवडींचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत शाश्वत बदल करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
हेही वाचा - World Sleep Day 2023 : चांगल्या आरोग्यासाठी आहे ६ तास झोप घेणे महत्वाचे, पुरेशा झोेपअभावी 'हे' होतात वाईट परिणाम