गरोदरपणात सामान्यत: वडीलधारी लोक महिलांना केशर घेण्याची शिफारस करतात, कारण ते औषधी गुणांनी परिपूर्ण असते आणि गरोदरपणात महिलांमध्ये सकारात्मक भावना वाढवते. महिलांच्या आयुष्यात गरोदरपणा ही एक अशी परिस्थिती आहे, जी त्यांच्या शरीर आणि आरोग्यावर परिणाम करते, अशात केशरचे औषधीय गूण त्यांना गरोदरपणात होणाऱ्या समस्यांपासून आराम देऊ शकते, परंतु त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर.
मातृत्व निसंशयपणे एक जीवन बदलणारा अनुभव आहे, मात्र बाळाचा जन्म एक मोठी जबाबदारी देखील असते. एखाद्या महिलेला गर्भवती झाल्याचे समजताच तिचे आणि तिच्या जवळपासच्या लोकांचे लक्ष महिला आणि गर्भाची काळजी कशी घ्यावी, याकडे एकवटते. अशात गर्भवती महिलेचे निरोगी राहणे गरजेचे आहे, ज्यात संतुलित आहार, चांगल्या सवयी आणि आनंदी राहण्यासारख्या सवयी खूप महत्वाच्या भूमिका बजावतात.
अशात केवळ घरातील वडीलधारी आणि जाणकारच नव्हे तर, आयुर्वेदिक डॉक्टर देखील ठरलेल्या प्रमाणात नऊ महिन्यांदरम्यान महिलांनी केशरचे सेवन करण्याची शिफारस करतात. वास्तविक केशर विशेष मसाल्यांच्या श्रेणीत येतो. तो क्रोकस सटायव्हस (crocus sativus) या फुलांपासून मोठ्या कष्टाने मिळतो, ज्याचा वापर अनेक पदार्थांसह आयुर्वेदिक औषधींमध्ये देखील होतो. केशरचे अनेक आरोग्य लाभ आहेत. गरोदरपणात केशर कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकतो आणि त्याचा वापर कसा करावा, याबाबत 'रसायनम'चे संस्थापक आणि सीईओ आयुष अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली.
गरोदरपणात केशर खाण्याचे फायदे
1) मन:स्थिती चांगली करण्यास सक्षम
गरोदरपणाच्या नऊ महिन्यांदरम्यान महिलांमध्ये मूड स्विंग एक सामान्य समस्या समजली जाते. यासाठी सामान्यत: जलद हार्मोनल बदल किंवा गरोदरपणात होणाऱ्या शारीरिक समस्यांना जबाबदार समजल्या जाते. अशा स्थितीत स्त्रियांना एका क्षणात खूप आनंद वाटतो तर, दुसऱ्या क्षणात खूप दुखी वाटते, तर कधी त्यांना चिडचिड वाटते. अशात केशरचा वापर अधिक फायदेशीर समजला जातो, कारण त्याच्या सेवनाने शरीरात सेरोटोनिनची निर्मिती होते, जो तुमच्या शरीरात रक्ताच्या प्रवाहाला वाढवून तुमचा मूड नियंत्रित करणे आणि भावनात्मक चढउतारांना नियंत्रित करण्यासाठी सक्षम असतो.
2) तुम्हाला चांगली झोप देते
गरोदरपणात होणाऱ्या शारीरिक समस्यांमुळे महिलांच्या झोपेवर विपरित परिणाम होतो. अशात झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम केशरचे दूध पिल्याने मन शांत होऊ शकते आणि मूड देखील चांगला राहू शकतो, जे चांगली झोप होण्यास मदत करते.
3) दुखण्यापासून आराम देते
गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शरीरात अनेकवेळा वेदना होण्याची समस्या दिसून येते. त्या सामान्यत: सहन करण्यायोग्य असतात, मात्र कधीकधी ते गंभीर आणि असहनीय देखील होऊ शकतात. अशात केशरचे सेवन फायदेशीर ठरू शकते, कारण ते वेदनांना कमी करण्यास मदत करते. याचे सेवन शरीराच्या सर्व स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांना शात करण्यास मदत करू शकते.
4) उच्च रक्तदाब कमी करते
गरोदरपणात रक्तदाबाची पातळी देखील प्रभावित होते, कारण नऊ महिन्यांच्या या काळात रक्तदाब सामान्यत: वाढतो. अशात जर रक्तदाब वाढू लागला तर, केशर त्याला नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
5) हृदयाचे कार्य वाढवते
गरोदरपणात जंक फूड किंवा मसालेदार अन्न खाण्याची इच्छा निश्चितपणे महिलांमध्ये कॅलरीचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीतही वाढ होऊ शकते आणि हृदयाचे आरोग्यही प्रभावित होऊ शकते. केशर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. केशरमधील पदार्थ रक्तवाहिन्यांना बंद होण्यास थांबवतात आणि तुमच्या शरीरात ऑक्सिजनच्या पातळीला वाढवते.
6) अॅलर्जीशी करतो दोन हात
गर्भवती महिलांमध्ये अॅलर्जी आणि संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशात केशर संभाव्य रुपात सर्व हंगामी अॅलर्जी, श्वास घेण्यात त्रास, छातीत जमाव आणि अन्य समस्यांशी लढण्यात तुमची मदत करतो. हा मसाला तुम्हाला तुमच्या शरीरातील सर्व नको असलेल्या आजारांपासून मुक्त करण्यात उपयुक्त ठरू शकते.
फक्त एवढेच नव्हे तर, केशरचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत, जे गर्भावस्थेत महिलांना लाभ देऊ शकतात. त्याचे योग्य प्रमाणात सेवन महिलांच्या आरोग्यासाठी सुरक्षित आणि खूप फायदेशीर आहे. जोपर्यंत त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले जाते, तोपर्यंत त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. हे सर्व फायदे असतानासुद्धा गर्भावस्थेत त्याचे सेवन करण्याअगोदर वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.
हेही वाचा - दम्याचा त्रास आहे? 'ही' योगासने ठरू शकतात फायदेशीर