सहसा लोकांना कुंड्यांची निवड कशी करावी याबाबत अधिक माहिती नसते. परिणामी, चुकीची कुंडी निवडल्याने एकतर झाडाची वाढ होत नाही किंवा जास्त खत आणि पाण्यामुळे वाढल्यानंतर त्याचा मृत्यू होतो. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला वनस्पतीसाठी योग्य कुंडी कशी निवडावी आणि तिला ठेवण्यासाठी कुठले स्थान आदर्श राहील याबद्दल माहिती देणार आहोत.
योग्य कुंडी कशी निवडावी?
कोणत्याही रोपासाठी कुंडी निवडताना त्या कुंडीतील पाण्याचा निचरा योग्य आहे की नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त लागवड करायच्या वनस्पतीच्या विकसित आकाराची माहिती घेऊनच कुंडी घ्यावी. कुंडी कोणत्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, बाहेर थेट ऊन पडणाऱ्या ठिकाणी किंवा खोलीच्या आतमधे, याबाबी लक्षात ठेवणे गरचेचे आहे.
योग्य आकार कसा निवडावा?
बाजारात लहान कपच्या आकाराच्या कुंड्यांपासून ते मोठ्या आकाराच्या कुंड्या मिळतात. ज्यामध्ये झाड देखील वाढवता येऊ शकते. योग्य वनस्पतीसाठी योग्य कुंडीची निवड आवश्यक आहे. महालक्ष्मी नगर इंदौरचे नर्सरी संचालक पवन सिंह सांगतात की, कुंडी घेताना वनस्पतीच्या मुळांच्या आकारानुसार ती घेतली पाहिजे. मोठी, लवकर पसरणारी मुळे असलेल्या वनस्पतींची जर कुंडीत लागवड केली तर, त्या वनस्पतीच्या विकासावर प्रभाव पडतो. त्यामुळे, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वनस्पतीसाठी कुंडी खरेदी करायची आहे, याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
कोणत्या प्रकारच्या वनस्पतीसाठी किती इंच खोलीची कुंडी योग्य राहील याबाबत पुढे माहिती देण्यात आली आहे.
1) 4 ते 10 इंच - छोटे एकल कॅक्टस आणि सक्यूलेन्टसाठी या आकाराची कुंडी वापरता येऊ शकते. मात्र, जर तुम्हाला एका कुंडीत एकापेक्षा अधिक सक्यूलेन्ट लावायचे असेल तर, कुंडीची रुंदी जास्त असणे गरजेचे आहे.
2) 10 इंच - या प्रकारची कुंडी छोटी मुळे असलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी, पसरणारे लहान फूल आणि छोट्या आकाराच्या सजावटी वनस्पतींसाठी आदर्श असते.
3) 12 ते 14 इंच - जर तुम्हाला कुंडीमध्ये छोटेसे किंचन गार्डन तयार करण्याची इच्छा असेल आणि गाजर, पालक, लहान आलू आणि पत्ता गोबी, हिरवी मिर्ची सारख्या भाज्या उगवण्याची तयारी असेल तर, त्यासाठी 12 ते 14 इंचच्या कुंड्या योग्य असतात. या व्यतिरिक्त अशी फुले ज्यांची मुळे खूप मोठी आणि पसरणारी नाही, त्यांची लागवड या प्रकारच्या कुंड्यामध्ये करता येऊ शकते.
4) 18 इंच - तुळस, गोबी, वांगे, टमाटर, भेंडी, डहलिया, गुलाब, पारिजात, चंपा, झेंडू, बोगनवेलिया सारख्या फुलांसाठी या कुंड्या योग्य असू शकतात.
5) 24 इंच - बोनसाई आणि अशी फुले, फळे किंवा भाज्यांची झाडे किंवा वनस्पती ज्यांची मुळे खूप खोलापर्यंत वाढतात जसे डाळिंब, लिंबू, पेरू, गोड कडुलिंब आणि मधुमालती सारख्या वेल असणाऱ्या वनस्पती आणि फर्न सारखे विविध सजावटीच्या वनस्पतींसाठी या आकाराच्या कुंड्या योग्य असतात.
6) 30 इंच - या आकाराच्या कुंडीमध्ये संपूर्ण झाड उगवते. सहसा लोक आपल्या घरी या आकाराच्या कुंडीत केळ, सफरचंद, खजूर ( शोभेच्या ) आणि निम सारखी झाडे लावतात.
कुंडीचे मटेरिअल कसे असावे?
वनस्पतीच्या योग्य विकासाठी केवळ कुंड्यांचे आकारच नाही तर, त्याचे मटेरिअल म्हणजेच, कुंडी कोणत्या वस्तूने तयार केलेली आहे, ही बाब लक्षात ठेवणे देखील गरजेचे आहे. कुंड्यांचे काही लोकप्रिय प्रकार जे बाजारात सहज उपलब्ध असतात ते पुढील प्रमाणे आहेत.
1) मातीच्या कुंड्या
मातीने तयार केलेल्या पारंपरिक कुंड्यांना गार्डनिंगसाठी चांगले समजले जाते. परंतु, यांच्यात सर्वात मोठी समस्या ही की, कालांतराने त्यांचे बाह्य कवच पडू लागते आणि ते आजूबाजूला घाण तयार करते. घरातील झाडांसाठी या प्रकारच्या कुंड्या निवडणे अयोग्य राहील. कारण त्या तुटण्याचा धोका अधिक असतो. परंतु, वनस्पतींच्या आरोग्याच्या दृष्टीने मातीच्या कुंड्या सर्वाधिक उपयोगाच्या असतात. मातीच्या कुंडीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते, त्यामुळे मातीत बराच काळ थंडपणा आणि ओलावा टिकून असतो.
2) सिरेमिक आणि सिमेंट्च्या कुंड्या
सिरेमिक आणि सिमेंट दोघांची गुणवत्ता एक सारखी असते. ते विविध आकार आणि प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. जर तुम्हाला बोगनविलिया, मेंडरिन, इक्जोरा, पॉम, अकेलिफा यांसारख्या मोठ्या झाडांची लागवड करायची असेल तर, त्यांच्यासाठी सिमेंटच्या मोठ्या कुंड्या योग्य राहील. तेच बोन्साईसाठी बहुतांश लोकं आयातकृती, चौरस, अंडाकृती, गोल आकाराचे सपाट पृष्ठभाग असणाऱ्या सिरेमिक कुंड्यांना प्राथमिकता देतात. तसेच, सक्यूलेन्ट व कॅक्टस कुटुंबातील झाडांना छोट्या सिरेमिक कुंड्यांमध्ये लावता येऊ शकते.
3) ग्रो बॅग्स
या प्रकारच्या बॅग्स आजकाल ट्रेंडमध्ये आहेत, परंतु ग्रो बॅग ही प्रत्येक स्थानासाठी आणि वनस्पतीच्या प्रकारासाठी योग्य नाही, कारण बहुतांश प्रकरणांमध्ये यांच्यातून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. विशेष म्हणजे, झाडाची माती उन्हाळ्यामध्ये खराब होऊ लागते.
4) प्लास्टिकची कुंडी
ही कुंडी स्वस्त आणि वजनाने हलकी असते. इंडोर प्लांट्ससाठी ती चांगली मानली जाते. मात्र, या कुंडीला थेट उन्हाच्या संपर्कात आणणाऱ्या स्थानांवर ठेवणे टाळावे, कारण तिला थेट उन पडणाऱ्या जागेवर ठेवल्यास तिच्या प्लास्टिकवर परिणाम होईल, जे वनस्पतीच्या मुळांना देखील नुकसान पोहचवू शकते.
हेही वाचा - चेहऱ्यावर फ्रेकल्स आहेत? मग अस्वस्थ होऊ नका, 'ही' दिलासादायक माहिती वाचा