हैदराबाद - सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. एक डॉक्टर आणि होमीओपॅथ असल्याने, मी माझ्या हॉस्पिटलमध्ये बर्याच नवीन गोष्टी अनुभवत आहे. माझ्या एका रूग्णाची एका महिन्यापूर्वी कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. एक महिना उलटून गेल्यानंतरही तो रुग्ण अजूनही बरा झालेला नाही. रुग्णांच्या अशा स्थितीला आपण “लाँग कोवीड” म्हणून ओळखतो. अशाप्रकारचा कोवीड लोकांच्या स्वास्थ्यावर अत्यंत वाईट परिणाम करत आहे आणि त्यांना कमजोर बनवत आहे. अगदी थोडे अंतर चालल्यानंतरही त्यांना जास्त त्रास होत आहे. कोरोना साथीच्या काळात आतापर्यंत केवळ लोकांचे प्राण वाचवण्याकडे लक्ष दिले जात होते. परंतु आता, नागरिक कोवीड -१९ संसर्गाच्या दीर्घकालीन परिणामांना तोंड देत आहेत, असे डॉ. ए. के. अरुण यांनी सांगितले.
'लाँग कोविड' म्हणजे काय ?
‘लाँग कोविड’ म्हणजे नेमके काय? याची अद्याप वैद्यकीय व्याख्या करण्यात आलेली नाही. परंतु त्याची सर्वसामान्य लक्षणे म्हणजे थकवा येणे किंवा कमजोर वाटणे, हे आहेत. याच्या इतर लक्षणांमध्ये: श्वसनाचा त्रास, न थांबणारा खोकला, सांधेदुखी, स्नायू दुखी, ऐकण्याची आणि डोळ्यांची समस्या, डोकेदुखी, वास आणि चव न कळणे यासोबतच हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि आतडे यांचे दुखणे आदी लक्षणांचा यात समावेश होतो. शिवाय नैराश्य, चिंता, मृत्यूची भीती वाटणे, एकटे राहण्याची भीती आणि स्पष्ट विचार न करता येणे. अशा अनेक मानसिक आरोग्याच्या समस्याही या रुग्णांमध्ये आढळतात.
हा प्रकार लोकांचे जीवनमान पूर्णपणे नष्ट करू शकतो. “मी यापूर्वी कधीही अशा प्रकारचा थकवा अनुभवला नव्हता,” असे एका रुग्णाने सांगितले. लाँग कोवीड म्हणजे असे नाही की, रुग्णांना बरे होण्यासाठी केवळ जास्त काळ अतिदक्षता विभागात राहवे लागते. तुलनेने अगदी सौम्य संसर्ग झालेल्या लोकांनाही कायमस्वरुपी आणि गंभीर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. १० पैकी एका व्यक्तीला ३ आठवड्यांनंतरही कोविड -१९ ची लक्षणे आढळत आहेत.
युनायटेड किंगडममधील एका अभ्यासात असे दिसून आले आहे, की यूकेमधील सुमारे चार दशलक्ष कोरोना बाधित लोकांपैकी १२ टक्के लोकांना ३० दिवसांनंतरही कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्याचा ताजा, अप्रकाशित डेटा सूचित करतो, की सर्व संक्रमित ५० (२ टक्के) लोकांपैकी एका व्यक्तीला ९० दिवसानंतर लाँग कोवीडची लक्षणे आढळत आहेत.
विषाणूमुळे ‘लाँग कोविड’ ची बाधा कशी होते?
हा विषाणू बहुतेक शरीरातून काढून टाकला गेला जातो, परंतु काही विषाणू शरीरातील लहान पॉकेट्समध्ये तसेच रेंगाळत राहतात. किंग्ज कॉलेज लंडनमधील प्रोफेसर टिम स्पेक्टर यांच्या मते, “एखाद्याला दीर्घकालीन डायरीया झाला असेल तर त्यांच्या आतड्यात आपल्याला काही प्रमाणात विषाणू सापडतात. जर वास येणे कमी झाले तर अशावेळी विषाणू मज्जातंतूंमध्ये असतो. त्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. कोरोना विषाणू थेट शरीरातील विविध प्रकारच्या पेशींमध्ये संक्रमित होऊ शकतो आणि अतिरक्त रोगप्रतिकार पेशींना ट्रिगर करू शकतो. ज्यामुळे संपूर्ण शरीराचे नुकसान होते. कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या छातीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जळजळीमुळे त्यांना अगदी कमी वयातच हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला जर ‘लाँग कोविड’ झाला आहे, असे वाटत असेल तर काय केले पाहिजे?
शारीरिक ऊर्जा वाचवण्यासाठी ‘तीन पी’ चे (Three P) पालन करणे महत्त्वाचे आहे:
Pace yourself - जास्तीची कठीण शारिरीक हालचाल करू नका आणि स्वतः ला जास्तीत जास्त विश्रांती कशी मिळेल, याची खात्री करा.
Plan - दिवसाचे योग्य नियोजन करा. जेणेकरून आठवड्याभरात तुमची दमछाक करणारी शारीरिक कामं विभागली जातील.
Prioritise - आपल्याला काय करणे गरजेचे आहे आणि काय बंद केले जाऊ शकते, याचा विचार करा.
तसेच तुम्ही जर अपेक्षित काळात लवकर बरे झाला नाहीत. तर तुम्ही थेट रूग्णालयाशी किंवा डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो सल्ला घ्यावा.
‘लाँग कोविड’सह जगणे -
जी लोक कोविड -१९ विषाणूच्या सौम्य लक्षणांमुळे आजारी पडतात, अशी लोकं जवळपास २ आठवड्यांच्या आत बरे होणे अपेक्षित असते. परंतु बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांना सुरुवातीला विषाणूची बाधा झाल्यानंतर एका महिन्यांनीही कोरोनाची लक्षणं दिसत आहेत. “लाँग कोविड” म्हणून ओळखल्या जाणार्या या घटनेने शास्त्रज्ञही चकीत झाले आहेत.
होमिओपॅथी सकारात्मक उपचार -
माझ्याकडे प्रत्येक दिवसाला एक किंवा दोन रुग्ण कोविड -१९ च्या दीर्घ आजाराची तक्रार करत आहेत. जे मागील तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून कोरोनाबाधित आहेत. सध्या बर्याच बाबतीत मी होमिओपॅथिक औषधे वापरत आहे आणि रुग्ण याला चांगला प्रतिसादही देत आहेत. यामध्ये आर्सेनिकम अल्बम, अॅसिड सरकोलॅक्टिकम, बेल्लाडोना, ब्रियोनिया, कम्फोरा, ओस्सिलोकॉसीनम आदी औषधांचा समावेश आहे. रुग्णांच्या वैयक्तिक लक्षणांनुसार ठरावीक औषधे देवून त्यांच्यावर उपचार केला जात आहे, असे डॉ. अरुण यांनी सांगितले.
डॉ. ए. के. अरुण, एम.डी. (होमिओपॅथी), हे दिल्लीस्थित होमिओपॅथीचे अभ्यासक आणि संशोधक आहेत. तसेच ते बोर्ड ऑफ होमिओपॅथिक सिस्टम ऑफ मेडिसीनचे उपाध्यक्षही आहेत. नुकतेच गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी दिल्लीने कोरोना विषाणू रोगासंदर्भात काही महत्त्वाच्या अंतर्गत नोंदी उघड केल्या आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी आणि विविध शंका-कुशंकासाठी डॉ. ए. के. अरूण यांच्याशी संपर्क साधा. docarun2@gmail.com
(टीप - होमिओपॅथिक औषधे ही योग्य होमियोपॅथिक फिजिशियनच्या मार्गदर्शनाखालीच घेणे आवश्यक आहे.)