ETV Bharat / sukhibhava

पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम करत आहे कोविड - १९, वाचा... - पुरुष लैंगिक आरोग्य माहिती डॉ रेड्डी

कोरोनाच्या लाटांमुळे पुरषांच्या लैंगिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे का? याबाबत अँड्रो केअर अँड अँड्रोलॉजी इन्स्टिट्यूट, हैदराबादमधील अँड्रोलॉजिस्ट डॉ. राहुल रेड्डी यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणतात....

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 4, 2021, 6:47 PM IST

गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने नागरिकांना फक्त शारीरिक आजाराची भीतीच नव्हे, तर मानसिक त्रास, चिंता आणि तणावासारख्या समस्या देखील दिल्या आहेत. कोविड-१९ चा काळ स्त्री-पुरुषांच्या आरोग्यावर खूपच भारी गेला. विशेष करून पुरुषांबाबत बोलायचे, तर मानसिक त्रास, शिस्तबद्ध नसलेली जीवनशैली, नित्यक्रमामुळे त्यांच्या लैंगिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. वर्तमान काळात पुरुषांमध्ये लैंगिक संबंधांकडे दुर्लक्ष करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम करत आहे कोविड - १९

कोविड - १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितींचा परिणाम पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर खूप नकारात्मकरित्या झालेला आहे. विशेष करून कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेल्या जनहाणीने नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर एक अलगच प्रकारचा परिणाम टाकला. डॉक्टरांच्या मते, मानसिक आरोग्यात झालेले विकार व्यक्तीच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम टाकतात. याबाबीचे पुष्टीकरण कोरोना काळात विशेष करून पुरुषांमध्ये वाढलेल्या लैंगिक समस्येसंबंधी आकडे करतात.

हार्मोन्समध्ये असंतुलन

अँड्रो केअर अँड अँड्रोलॉजी इन्स्टिट्यूट, हैदराबादमधील अँड्रोलॉजिस्ट डॉ. राहुल रेड्डी सांगतात की, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यापासूनच डॉक्टरांकडे लैंगिक समस्येसंबंधी सल्ला मागणाऱ्या पुरुषांची संख्या वाढली आहे. ज्यात बहुतेक पुरुष लैंगिक इच्छेत कमी आणि अंशत: इरेक्टाईल डिसफंक्शन (नपुंसकता) या समस्येचा सामना करत आहेत. लॉकडाऊनमुळे शिस्तबद्ध नसलेले नित्यक्रम आणि जीवनशैलीमुळे पुरुशांच्या शारीरिक क्षमतेला खूप जास्त प्रभावित केले आहे.

व्यायामाचा अभाव, जेवणाविषयी असंतुलन, जास्त मद्यपान यांसारख्या अनेक अस्वस्थ सवयी, तथा अधिक मानसिक दबाव, यामुळे मोठ्या संख्येत पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनची कमतरता दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर, या परिस्थितीमुळे लैंगिक इच्छेत कमी आणणाऱ्या प्रोलॅक्टिनच्या पातळीवरही परिणाम होत आहे. जरी देशातील बहुतांश भागांमध्ये लॉकडाऊन हळू-हळू उघडत असले, तरी लॉकडाऊन काळात जास्त काळ घराच्या आत राहणाऱ्या पुरुषांमध्ये विटामिन-डी सह इतर आवश्यक पोषक तत्वांमध्ये घट दिसून आली आहे, असे डॉ. रेड्डी म्हणाले.

मानसिक आरोग्याचा लैंगिक समस्येवर परिणाम होतो

वरिष्ट मनोचिकित्सक डॉ. वीना कृष्णन देखील वर्तमान स्थितीत पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिसफंक्शन आणि कामेच्छेमध्ये कमी येणे यासाठी अस्वस्थ जीवनशैली आणि मानसिक तनावाला जबाबदार मानतात. कृष्णन यांच्या मते, कोरोनामुळे नागरिकांचे परस्पर संबंध तथा सामाजिक व्यवहार, या दोन्ही बाबींवर परिणाम झाला आहे. संसर्ग होण्याच्या भीतीने मित्र आणि नातेवाईकांशी भेट न होणे, सण-उत्सव आणि व्यवहार यांसारख्या सामाजिक आयोजनांमध्ये उपस्थित न राहू शकणे, तसेच आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम नागरिकांच्या वागण्यावर होत आहे, आणि त्याचा परिणाम त्यांच्या सेक्स जीवनावरही होत आहे.

घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांच्या परस्पर संबंधांना देखील नुकसान पोहचले आहे. कोरोना काळात घरगुती हिंसाचार पाच पटीने वाढले आहे. घरगुती हिंसाचार अनेक प्रकारचे असू शकतात जसे, शारीरिक, तोंडी, भावनिक आणि आर्थिक. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपल्या नातेवाईकांना गमवले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अनेक प्रकारच्या कौटुंबिक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे, लोकांमध्ये चिंता आणि त्रास दोन्ही वाढले आहेत. हे देखील घरगुती हिंसाचाराचे एक मुख्य कारण असू शकते, असे डॉ. वीना कृष्णन सांगतात.

अस्वस्थ जीवनशैलीमुळे समस्या वाढल्या

चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे गरजेचे आहे. म्हणून नित्यक्रम शक्य तितके शिस्तबद्ध असणे गरजेचे आहे. अन्न नेहमी ताजे, पचण्याजोगे आणि पौष्टिकच घ्यावे आणि नियमित व्यायाम करावा. मात्र, कुठल्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक समस्या जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञाशी संपर्क साधावा, असा सल्ला डॉ. राहुल रेड्डी यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.