ETV Bharat / sukhibhava

New Year Recipe : पालक पनीर बनवून नवीन वर्ष साजरे करा थाटामाटात, जाणून घ्या ही झटपट रेसिपी... - झटपट रेसिपी

31st रोजी जगभरात नवीन वर्ष साजरे केले जात (Celebrate the New Year) आहे. या खास प्रसंगी, लोक त्यांच्या घरी पाहुण्यांसाठी अनेक चवदार पदार्थ बनवतात. आज आम्ही तुम्हाला चवदार, मसालेदार आणि पौष्टिकतेने परिपूर्ण 'पालक पनीर'ची रेसिपी (Palak Paneer recipe) सांगत आहोत. पालक आणि पनीर दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (New Year 2023)

Palak Paneer
पालक पनीर
author img

By

Published : Dec 28, 2022, 12:11 PM IST

हैदराबाद : हिवाळ्यात, लोक विशेषतः पालक पनीर करी बनवायला आवडतात. त्यामुळे जेवणाची चवही वाढते. जर तुम्हालाही पालक पनीरचा आस्वाद घरी घ्यायचा असेल, तर आमच्या सांगितल्या गेलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला जाणून घेऊया 'पालक पनीर' (Palak Paneer recipe) बनवण्याची (quick recipe) झटपट रेसिपी- (Celebrate the New Year)

पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य : (Ingredients for making Palak Paneer) - पालक - 200 ग्रॅम, पनीरचे चौकोनी तुकडे - 1.5 कप, वेलची - 2, मलाई - 3 टेस्पून, गरम मसाला - 1/4 टीस्पून, कसुरी मेथी - 2 टीस्पून, लोणी - 1 टीस्पून, तेल - 3-4 टीस्पून, लसूण पाकळ्या - 3, हिरवी मिरची - 2-3, आले - 1 इंच तुकडा, बारीक चिरलेला कांदा – 2, टोमॅटो चिरून - 1, जिरे - 1 टीस्पून, लवंगा - 2-3, दालचिनी - 1 इंच तुकडा, तमालपत्र - 2, मीठ - चवीनुसार.

  • पालक पनीर बनवण्याची कृती : (Recipe for making palak paneer)- पालक पनीर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 5-6 कप पाणी घाला आणि त्यात पालक टाका आणि मध्यम आचेवर उकळा. पालकाचा रंग बदलून पूर्ण मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि पालकावर थंड पाणी घाला. पालक पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पालक, आले, लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा, त्यानंतर ही पेस्ट एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.
  • आता कढईत तेल आणि बटर टाकून मध्यम आचेवर गरम करा. लोणी वितळल्यावर त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घालून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. यानंतर तळलेले पनीर एका भांड्यात काढून ठेवा. आता एका कढईत थोडे तेल टाकून त्यात वेलची, जिरे, लवंगा, दालचिनी, कसुरी मेथी आणि तमालपत्र टाकून मध्यम आचेवर तळून घ्या.
  • या मसाल्यांतून सुगंध यायला लागल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता. यानंतर चिरलेला टोमॅटो घालून शिजवा. टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात आधीच तयार पालक पेस्ट, थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही शिजवा. रस्सा उकळायला लागल्यावर त्यात तळलेले पनीर घालून चांगले मिक्स करा आणि भाजी 5 मिनिटे शिजू द्या, मग गॅस बंद करा.
  • आता भाजीत कसुरी मेथी, ताजी मलाई आणि गरम मसाला घालून मिक्स करून घ्या. चवदार पालक पनीरची भाजी तयार आहे. त्यावर कोथिंबीर घालून सजवा. ती दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात रोटी, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.