ETV Bharat / sukhibhava

स्त्रियांमधील ‘एग फ्रीझिंग’बद्दलचे समज-गैरसमज

सध्याच्या परिस्थितीत अनेक स्त्रिया वयाच्या तीशी-चाळीशीपर्यंत कुटुंब नियोजन करतात. त्यामुळे गर्भधारणेसाठी अनेकजणी 'एग फ्रीझिंग'चा पर्याय निवडतात. त्या तरुणपणीचे निरोगी एग्ज् जपून ठेवतात. बेंगळुरूच्या क्लाऊडिन ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सल्लागार व प्रजनन औषध तज्ज्ञ, डॉ. रम्या गौडा यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.

author img

By

Published : Dec 18, 2020, 12:19 PM IST

Updated : Dec 18, 2020, 1:06 PM IST

Egg Freezing
‘एग फ्रीझिंग

हैदराबाद - स्त्रियांमधील एग फ्रीझिंग ही प्रक्रिया शरीरातील जैविक घडाळ्याप्रमाणे होत असते. स्त्रीची प्रजनन क्षमता २०व्या वर्षी खूप जास्त असते. साधारणपणे स्त्री वयाच्या तिशीत पोचली की, ही क्षमता कमी व्हायला सुरुवात होते. निरोगी स्त्रीने तिशी ओलांडली की तिची गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होतेच, शिवाय इतर प्रजनन समस्याही सुरू होतात.

डॉ. रम्या गौडा सांगतात, ‘सध्या अनेक स्त्रियांचे एग फ्रीझिंगकडे लक्ष वेधले गेले आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मात्र, दुर्दैवाने अनेकदा याबद्दल गैरसमजही पसरतात. डॉ. गौडा यांनी एग फ्रीझिंगबद्दलचे अनेक गैरसमज समजावून सांगितले.

१) एग फ्रीझिंग हा अजूनही प्रयोगात्मक पर्याय आहे -

२०१३ च्या आधी एग फ्रीझिंग हे पूर्णपणे नवे होते आणि त्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती. शास्त्रीय माहितीनुसार, एग फ्रीझिंग हे पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी आहे. आता ते प्रयोगात्मक राहिले नाही. ओव्हरीयन स्टिम्युलेशन, एग रिट्राइव्ह आणि क्रायपोरिझर्वेशन अनेक दशकांपासून वापरले जाते आणि ते पूर्णपणे सुरक्षित आहे.

२) एग फ्रीझिंगने आई आणि बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो -

एग फ्रीझिंगकरून कुणाचाच जन्म झाला नाही. ओव्हरियन स्टिम्युलेशन आणि एग फ्रीझिंगने कुठल्याही स्त्रीला किंवा तिच्या होणाऱ्या संततीला धोका पोचला आहे, असा काही पुरावा उपलब्ध नाही. एग फ्रीझिंग वापरून झालेली गर्भधारणा आणि सर्वसाधारण गर्भधारणा यात मुलाच्या जन्मावेळी काही फरक नसतो. होणारे दुष्परिणाम अपवादाने असतात आणि तेही अगदी किरकोळ असतात. एग फ्रीझिंगने तुम्हाला उशिरा बाळ होण्याची संधी वाढते.

३) ही प्रक्रिया वेदनादायी आणि वेळखाऊ आहे -

प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी हार्मोन औषधोपचार इंजेक्शन्स साधारणत: ८ ते ११ दिवसांसाठी दिवसातून एकदा किंवा दोनदा दिली जातात. या कालावधीत, आपले शरीर औषधाला कसे प्रतिसाद देत आहे, हे निरीक्षण करण्यासाठी एक डॉक्टर ५ ते ७ वेळा येऊन पाहतात. एकदा का तुमचे शरीर तयार आहे, हे जाणवले की तुमच्यावर शस्त्रक्रिया होईल. तुम्हाला ‘शस्त्रक्रिया’ हा शब्द घाबरवणारा वाटेल, पण ताण घेऊ नका. कारण या प्रक्रियेत टाके नाहीत, कट्स नाहीत आणि याला फक्त १५ मिनिटे लागतात. ही सर्व प्रक्रिया सुरू होऊन संपण्यासाठी २ आठवडे लागतात.

४) फ्रीझिंग एगमुळे भविष्यात स्त्रीला मूल होत नाही -

आतापर्यंतच्या अभ्यासात फ्रीझिंग एगमुळे स्त्री वांझ होते, असा काही पुरावा उपलब्ध नाही. कारण एग फ्रीझिंगमध्ये शरीरातले अंडे काढले जाते, अनेकांना वाटते यामुळे गर्भधारणा होण्यासाठी लागणाऱ्या अंड्यांची संख्या कमी होते. हा गैरसमज आहे. या प्रक्रियेत अनेक अंडी विकसित व्हावी यासाठी औषधे वापरली जातात.

५) फ्रोझन एगपेक्षा ताजे एग कधीही चांगले -

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार निरोगी गर्भधारणा फ्रोझन एगमुळेच झाली आहे. फ्रोझन एग आणि ताजे एग यामुळे गर्भधारणेत फारसा फरक जाणवला नाही. जेव्हा प्रजननाचा प्रश्न येतो तेव्हा अंड्याचे वय महत्त्वाचे ठरते. तुमचे अंडे जितके कमी वयाचे तितकी गर्भधारणा निरोगी. वयाच्या ३५ व्या वर्षापासून, व्हिट्रो फर्टिलायझेशनमध्ये त्याच वयातील स्वत: च्या अंडी वापरणार्‍या स्त्रियांसाठी दर दोन वर्षांनी थेट जन्माच्या दरात १० % घट येण्यास सुरुवात होते.

६) एग फ्रीझिंग हे श्रीमंत वर्गातच किंवा उच्चभ्रू महिलांमध्येच केले जाते -

एखादी स्त्री एग फ्रीझिंगचा पर्याय अनेक वैद्यकीय आणि सामाजिक कारणांमुळे निवडते. अनेक जणी बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वातावरण नसल्याने हा पर्याय निवडतात. उदाहरणार्थ, आर्थिक समस्या, जोडीदार नसणे किंवा इतर जबाबदाऱ्या असणे. अनेक स्त्रियांची वेगवेगळी कारणे असतात. हल्ली अनेक स्त्रिया आता जोडीदार नसल्याने एग फ्रीझिंग करतात.

७) स्त्रीसाठी एज फ्रीझिंग हा तीशीनंतर चांगला जीवन विमा आहे -

तुम्ही ३५ वर्षाचे होण्या अगोदर एग फ्रीझिंग करून ठेवणे चांगले आहे. आपले वय वाढते, तशी आपली प्रजनन क्षमता कमी होते. म्हणून तरुणपणी एग फ्रीझिंग केले तर ते यशस्वी ठरते. अनेक स्त्रिया विशीत असतानाच आपल्याला कधी मूल हवे याचा विचार करू शकत नाहीत. म्हणून एग फ्रीझिंग तिशीत फायदेशीर ठरते. कदाचित तोपर्यंत त्या स्थिरस्थावर होत नाहीत पण, त्या याचा विचार करतात आणि या वयात त्यांचे एग चांगले असतात.

Last Updated : Dec 18, 2020, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.