कोरोनाच्या गेल्या दीड वर्षांच्या संकट काळाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे किती गरजेचे आहे, हे खूप चांगल्याने लक्षात आणून दिले आहे. या कठीण काळात लोकांनी आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे, हे समजले आहे. ज्यामुळे अनेक लोकांनी व्यायाम, विशेषकरून योगचे नियमित आभ्यास सुरू केले आहेत. परंतु, योगासनांचा आभ्यास शरीराला फायद्यांऐवजी नुकसान पोहचू नये, यासाठी काही बाबींना लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
योगमध्ये असे मानले गेले आहे की, जीवनाची गुणवत्ता ही रोग आणि शरीरातील वेदनांच्या अनुपस्थितीसह मनाची शांती, उर्जेचा संचार आणि शेवटी तुमच्या आभ्यासात स्वायत्तेची उच्च पातळी गाठण्याच्या क्षमतेने मोजली जाते. योग जीवनाच्या प्रत्येक उदाहरण आणि योगसाधणेप्रति एक अत्यंत अचूक, प्रत्यक्ष आणि व्यवहारिक दृष्टीकोन ठेवतो. पण, योगचा अर्थ फक्त आसने करणे असा नाही. योग आसनांचा संपूर्ण लाभ आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा योगचा आभ्यास आवश्यक नियम आणि सूचनांनुसार केला जाईल.
सर्वा फाउंडेशनचे संस्थापक सर्वेश शशी सांगतात की, जर तुम्ही योग आसनांचा आभ्यास सुरू करण्यास इच्छुक असाल तर, चांगल्या परिणामांसाठी पुढील 10 बाबींना लक्षात ठेवणे गरजेचे आहे,
- सर्वात आधी योग आभ्यासासाठी एक वेळ आणि जागा निश्चित करा. लक्षात ठेवा, व्यायामासाठी अशी वेळ ठरवा जेव्हा तुमच्या शरीरात आरामाच्या वेळेनंतर चांगली उर्जा असेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी, कुठलाही वेळ ठरवू शकता.
- योग नेहमी उपाशी पोटी करा. जेवण केल्याच्या कमीत कमी दोन तासांनंतरच योग आभ्यास केला पाहिजे. या 2 दोन तासांत थोड्या प्रमाणात द्रव पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो.
- योग आभ्यास करताना जमिनीच्या संपर्कात येणे टाळायला हवे. त्यामुळे, नेहमी मॅट किंवा ब्लांकेटवरच आभ्यास करा. हे केवळ तुमचा आभ्यास सुलभ करत नाही, तर तुमची सांधे दुखी टाळते आणि थंड जमिनीवर उर्जा हस्तांतरापासून बचावते.
- व्यायामादरम्यान लक्ष भटकने स्वाभाविक आहे, त्यामुळे योग आभ्यास अशा प्रकारे करा की, आभ्यासाच्या पूर्ण अवधीसाठी तुमचे लक्ष योग आभ्यासावरच केंद्रित राहावे. उदाहरणार्थ, व्यायामादरम्यान तुम्ही तुमचा फोन साइलेंटवर ठेवू शकत नाही, तर शक्य असल्यास त्यास दुसऱ्या खोलीत ठेवून द्या. याव्यतिरिक्त हेडफोनची मदत देखील घेता येऊ शकते.
- योगाभ्यासाची सुरुवात नेहमी एका चांगल्या वॉर्मअपने केली पाहिजे. ज्याने तुमच्या संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढेल. याने योगाभ्यासाचे चांगले परिणाम मिळतात. योगात सूर्य नमस्काराला उत्कृष्ट वॉर्मअप आभ्यास मानले जाते.
- विशिष्ट आसनांच्या चांगल्या प्रभावासाठी आपल्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या आभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर श्वास घेणे आणि बाहेर टाकण्याची पद्धती महत्वाची आहे. चुकीची श्वासोच्छवास पद्धती शरीरात वेदना किंवा आसनात आपल्या वास्तविक क्षमतेपर्यंत पोहोचण्यात अडथळा ठरण्याचे कारण ठरू शकते.
- योग आभ्यासादरम्यान आपल्या जखमांविषयी सतर्क राहा. जर तुम्हाल एखादी गंभीर दुखापत झाली असेल किंवा कोणत्याही कारणाने शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल किंवा तुम्ही कोणत्या शस्त्रक्रियेतून बरे होत आहात, तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आभ्यास केला पाहिजे. या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही या स्थितीतून बाहेर निघाल्यानंतर देखील योग आभ्यास करत असाल तर, निश्चितपणे आपल्या प्रशिक्षकांना आपल्या समस्यांबाबत सांगावे.
- योग शिक्षकाच्या मार्गदर्शणातच योगाभ्यास करावा. तुम्ही वैयक्तिकरित्या सराव करत असाल किंवा मित्रांच्या गटाबरोबर ऑनलाइन, योग्य शिक्षक असणे गरजेचे आहे.
- योगाच्या चांगल्या परिणामांसाठी योग्य कूल डाऊन, विश्रांती आणि ध्यानाने व्यायाम समाप्त करा. योग एक सायकोफिजिओलॉजिकल कला आहे, जी शरीरासारखीच मनाच्या उत्तमतेसाठी देखील आवश्यक असते.
- योगच्या आभ्यासादरम्यान पूर्णपणे जागरूक रहा. आभ्यासादरम्यान मन भटकणे हे व्यायामाचा अनुभव खराब करते. जरी हे सोपे नसले तरी, या नीतीने आभ्यास केल्यास परिणाम अधिक फायद्याचे असतात.
हेही वाचा - काय आहे एडीएचडी? 10 टक्के मुलांमध्ये मोठे झाल्यावरही दिसतात त्याची लक्षणे