ETV Bharat / sukhibhava

Benefits Of Potatoes : बटाटे आहेत आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे.. - आरोग्यासाठीही खूप फायदेशीर

Benefits Of Potatoes : बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो. बटाटा केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो.

Benefits Of Potatoes
बटाटा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 4:50 PM IST

हैदराबाद : Benefits Of Potatoes बटाटा सहसा सगळ्यानांच खायला आवडतो. बटाट्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो. बटाट्यामध्ये फायबर, झिंक, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. एवढेच नाही तर यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बटाट्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. इतकंच नाही तर हाडं मजबूत करण्यासाठीही बटाटे उपयुक्त आहे.

  • रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत : बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय बटाट्यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • पचन : जर तुम्हाला गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर बटाट्याचे सेवन करा, ते तुमच्या पोटात आणि गॅससाठी फायदेशीर ठरू शकते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि नियासिन हे घटक आढळतात जे गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.
  • वजन नियंत्रित राहते : बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो असे अनेक लोक मानतात पण तसे नाही. बटाट्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. यामुळे तुम्ही जास्त वेळा खाणे आणि जास्त कॅलरी खाणे टाळू शकता.
  • हाडांसाठी खूप चांगला : बटाटा हाडांसाठी खूप चांगला मानला जातो. हाडांसाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या बटाट्यामध्ये कॅल्शियम, कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे गुणधर्म आढळतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बटाट्यांचा समावेश करू शकता.
  • जास्त सेवन ठरू शकते हानिकारक : बटाट्याचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त बटाटे खाल्ल्याने वजन वाढते. वजन वाढल्यानं अनेक आजार होतात. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची प्रमाण वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. त्याचा जास्त वापर केल्याने शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढते, ज्यामुळे हायपरक्लेमिया होते. त्यामुळे धाप लागणे, दुखणे, उलट्या होणे अशा समस्या निर्माण होतात. बटाट्याच्या अतिसेवनाने रक्तदाब वाढतो.

हेही वाचा :

  1. Soaked Peanuts Benefits : रोज सकाळी खा भिजवलेले शेंगदाणे; तुमचा मेंदू होईल वेगवान...
  2. Jeera Water Benefits : एक कप जिऱ्याचे पाणी तुम्हाला बनवेल तंदुरूस्त; सकाळी अनोशा पोटी पिल्याने होतात हे फायदे.....
  3. Avoid These Habits After Meal : जेवल्यानंतर तुम्हीही लगेच करता का 'या' गोष्टी; घ्यावी लागेल काळजी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.