हैदराबाद - कांद्याची उग्र चव आणि वास ज्या व्यक्तींना आवडत नाही, त्यांना सोडून द्या. पण इतर अनेकांना कांद्याची चव आवडते. मग कोशिंबिरीतला कच्चा कांदा असो किंवा वर टाॅपिंग केलेला असो, अगदी ग्रेव्ही किंवा सुपमध्येही असलेला कांदा... प्रत्येक पदार्थात कांदा चविष्ठ लागतोच. आपल्या स्वयंपाकघरातले इतर मसाले, फळे आणि भाज्या जितक्या आरोग्यासाठी उपयोगी असतात, तेवढाच कांदा आरोग्य आणि सौंदर्यासाठी बहुगुणी आहे. विशेष करून हिवाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केले तर पचन चांगले होते, मधुमेह, अनेक प्रकारच्या अॅलर्जी आणि अनेक संसर्गजन्य रोग यावर कांद्याने मात करता येते.
कांद्यातले पोषक आणि आरोग्यदायी घटक
कांद्यात कमी कॅलरीज असतात. तसेच व्हिटॅमिन सी आणि बी ६, खनिजे मॅंगनीज, फायबर, फोलेट, फॉस्फरस आणि प्रथिने असतात. कांद्यात क्युरेसेटीन नावाचे अँटिऑक्सिडेंट भरपूर असते, जे विविध प्रकारचे रोग आणि अॅलर्जीपासून संरक्षण करते. तसेच प्रोस्टेट आणि मूत्र पिशवीला आराम देते. क्वरेसेटीनमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फायटो-केमिकल्स आहेत. यामध्ये अँटीहिस्टामाइन गुणधर्म आहेत, यामुळे हिवाळ्यात उद्भवणारी त्वचेची अॅलर्जी होत नाही. शिवाय शरीरातील जळजळ होण्याची समस्या दूर करण्यास मदत करते. फ्लेव्होनॉइड्स व्यतिरिक्त, पॉलिफेनोल्स देखील कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, जे मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकारापासून बचाव करते.
फक्त कांदाच नाही तर त्याच्या बिया- भारतात कालोंजी म्हणून माहीत आहेत – खाल्ल्या जातात. अनेक लोणच्यातला ही महत्त्वाचा घटक आहे. आणि आयुर्वेदाच्या औषधांमध्ये त्या वापरल्या जातात.
हिवाळ्यात कांद्याचे फायदे
- चांगली झोप येण्यास मदत
कांद्यातल्या पोषक घटकांमध्ये शरीरातले सेरोटोनीन आणि डोपामाइन हे हार्मोन्स असतात. या हार्मोन्समुळे तुमचा मूड चांगला राहतो आणि झोपही चांगली लागते.
- संसर्गापासून संरक्षण
कांद्यामध्ये दाहकता कमी करणारे, अँटीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. म्हणूनच हिवाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने खोकला, कानदुखी, ताप आणि इतर बर्याच रोगांशी लढायला मदत होते.
- शरीर उबदार ठेवतो
कांदा हा उर्जेचे घर समजला जातो. आणि हिवाळ्यात तुम्हाला उबदार ठेवतो. म्हणूनच थंडीत तुमच्या नेहमीच्या आहारात कांद्याचा वापर करायला हवाच.
- केस आणि त्वचेचे आरोग्य राखते
त्वचेचे आरोग्य कोलेजिनवर अवलंबून असते. त्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचे ठरते आणि कांद्यात ते मुबलक प्रमाणात असते. कांद्याचा रस केसांच्या मूळाशी लावला तर केस गळणे, केस पांढरे होणे आणि उवा होणे यापासून तुमचे संरक्षण होते. म्हणूनच केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये कांद्याचा वापर केला जातो.
- रक्तातली साखर नियंत्रणात ठेवते
रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यासाठी कांदा फायदेशीर मानला जातो, म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या रोजच्या आहारात कांद्याचा समावेश केला पाहिजे.
- पचन यंत्रणा सुधारते
कांद्यामध्ये मुबलक फायबर आणि प्रोबायोटिक्स असते. आतड्यांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. शिवाय प्रोबायोटिक्समुळे शरीरात कॅल्शियम शोषले जाते. ते हाडांच्या आरोग्यास उपयोगी आहे.
फक्त हिवाळ्यातच नाही, तर कांदे आणि त्याच्या रसाचे सेवन एरवीही अनेक समस्यांवर उपयोगी आहे. यामुळे लैंगिक सामर्थ्य वाढते, मूतखडा, दमा, संधीवात, स्मरणशक्ती सुधारणे आणि कीटक दंशावर कांदा अतिशय उपयोगी आहे.