यवतमाळ - घाटंजी तालुक्यातील अंजी न्रुरसिंह येथील एका मजुराची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. अरविंद कोहरे (वय. ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अंजी न्रुरसिंह येथे जिओ केबलच्या कामावरील मजूर सचिन पाटील आणि अरविंद कोहरे यांच्यात मजुरीच्या हफ्त्याच्या पैशावरून वाद झाला. रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायतच्या बाजूला आरोपी सचिन पाटील याने मयत अरविंद कोहरे (वय.३५) यांना घरून बोलावून नेले. त्यानंतर सचिन यांने अरविंद यांच्याशी पैशाबाबत वाद निर्मान करून त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मृत अरविंद यांच्या पत्नीला माहिती पडताच तिने घाटंजी पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसानी पंचनामा करून पूढील कार्यवाही करत आरोपी हा शेतात लपून बसलेला असताना त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास घाटंजी पोलीस ठाणे करीत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार यांनी भेट दिली आहे.
हेही वाचा- दुष्यंत चतुर्वेदींचा उमेदवारी अर्ज दाखल ; शंभर टक्के विजयाचा व्यक्त केला विश्वास