ETV Bharat / state

'वडार समाज अजुनही शासन दरबारी वंचित का'? वडार समाजाचा शासनाला सवाल - वडार समाज

पोटाची खळगी भरण्यासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणे, असा या समाजाचा इतिहास आहे. पाटे, खलबत्ते बनविणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र यांत्रिक युगात पाटे, खलबत्ता कोणीही विकत घेत नाही. डांबरी रस्त्याच्या कामात 40 अंश सेल्सिअस तापमानात उन्हाचा तडाखा सहन करत गोटे फोडण्याचे कामही मिळणे कमी झाल्याची भावना या समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

वडार समाज
वडार समाज
author img

By

Published : Mar 30, 2021, 4:39 PM IST

यवतमाळ - डोंगर, कपारी, जंगल आणि गावाबाहेर राहून दगडाला आकार देणारा वडार समाज स्वातंत्र्यानंतरही शासनाच्या सोयी-सुविधांपासून उपेक्षित आहे, अशी व्यथा यवतमाळमधील वडार समाजातील नागरिकांनी मांडली आहे. सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी हा समूह शासनाकडे आस लावून आहे. मात्र, त्यांची ही धडपड शासन दरबारी बेदखल ठरत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

'पोट भरणे झाले कठीण'
वडार समाजाची भटक्या विमुक्त जमातीत नोंद आहे. यात अनेक जमाती येतात. त्यात वडार समाजही आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणे, असा या समाजाचा इतिहास आहे. पाटे, खलबत्ते बनविणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र यांत्रिक युगात पाटे, खलबत्ता कोणीही विकत घेत नाही. डांबरी रस्त्याच्या कामात 40 अंश सेल्सिअस तापमानात उन्हाचा तडाखा सहन करत गोटे फोडण्याचे कामही मिळणे कमी झाल्याची भावना या समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आपल्या येणाऱ्या पिढीचे कसे होणार? त्यांना सोयी सुविधा सोडाच, साधे घरकुलही मिळत नाही. मतदान कार्ड ज्यांच्याकडे आहे, अशा लोकांना राजकीय पुढारी केवळ मतदानापुरते विचारतात, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहे.

प्रतिक्रिया देतांना नागरिक

'कागदपत्रे कुठून आणणार'
'प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात गेल्यास जन्म तारखेची नोंद मागितली जाते. रानावनात जन्म झालेल्या मुलांची नोंद कुठे सापडणार?' असा प्रश्न वडार समा़जातील लोक उपस्थित करत आहे. 'भटकंती करत वडार समाजाच्या कित्येक पिढ्या संपल्या. येणाऱ्या पिढीच्या वाटेला मरण यातना येऊ नये, उपेक्षित जीवन जगणाऱ्या समूहाचा आवाज आतातरी सरकारने ऐकावा.' अशी उद्विग्न प्रतिक्रिया वडार समाजातील नागरिकांनी दिल्या आहे.

हेही वाचा-बाजारपेठेत खरेदीला जाणा-या ग्राहकांवर टोल, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनोखी शक्कल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.