ETV Bharat / state

यवतमाळमध्ये दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - yavatmal daroda

यवतमाळमध्ये दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून धारदार शस्त्रासह काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अवधुतवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Sep 4, 2019, 12:24 PM IST

यवतमाळ - स्थानिक गुन्हे शाखेने धारदार शस्त्रे घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस मंगळवारी मध्यरात्री शहरातील गोधणी रोड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवधुतवाडी पोलीस ठाणे

पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त

सण आणि उत्सवाची शहरात धामधूम असताना कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच सऱ्हाईत गुन्हागारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे त्यांच्या पथकासह शहर परिसरात गस्त घालीत होते. यावेळी काही संशयित व्यक्ती गोधणी रोडवरील जसमीत अपार्टमेंटसमोर तोंडाला रुमाल बांधून संशयास्पद स्थितीत बसलेले असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपी राजू किसन वाघाडे (35, रा. पाटीपुरा), कृष्ण उर्फ कान्हा मारोती घोसळकर (28, रा. सिंघानिया नगर), समीर उर्फ टुप्पी घनश्याम कुसराम (29, रा. सिंघानिया नगर), रुपेश उर्फ टावर बाबाराव गजलवार (38, रा. निखील नगर, उमरसरा) आणि सुरज उर्फ लहाण्या गजानन मोहोड (34, रा. मोठे वडगाव) यांना ताब्यात घेतले. यावेळी सदर आरोपींकडून पोलिसांनी दोन चाकू, एक खंजर, एक लोखंडी रॉड, एक बांबूची काठी, नायलॉन दोरी, मिरची पावडर व एक बंदूक, असे साहित्य जप्त केले. सर्वांविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लाचप्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक; २५ हजारांसह शरीर सुखासाठी तीन मुलींची केली होती मागणी

Intro:Body:यवतमाळ : घातक शस्त्रे बाळगून दरोडा घालण्याच्या तयारीत असणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री शहरातील गोधणी रोड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली असून आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सण आणि उत्सवाची शहरात धामधूम असतांना कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरीता पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करून स-हाईत गुन्हागारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोयर हे त्यांच्या पथकासह (एमएच29 एम9565) या वाहनाने यवतमाळ शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काही संशयीत इसम गोधणी रोडवरील जसमीत अपार्टमेंट समोर तोंडाला रुमाल व गमछे बांधून हातात रॉडसारख्या वस्तू घेऊन संशयास्पद स्थितीत बसलेले आहेत. या माहितीची कल्पना वरिष्ठ अधिका-यांना देऊन पोलिस उपनिरीक्षक भोयर यांनी पंच व इतर स्टाफ सोबत घेऊन सदर घटनास्थळावर छापा मारला.
यावेळी आरोपी राजू किसन वाघाडे (35, रा. पाटीपुरा), कृष्ण उर्फ कान्हा मारोती घोसळकर (28,रा. सिंघानिया नगर), समीर उर्फ टुप्पी घनश्याम कुसराम (29, रा. सिंघानिया नगर) रुपेश उर्फ टावर बाबाराव गजलवार (38, रा. निखील नगर, उमरसरा) आणि सुरज उर्फ लहाण्या गजानन मोहोड (34, रा. मोठे वडगाव), सर्व यवतमाळ यांना ताब्यात घेतले. यावेळी सदर आरोपींकडून पोलिसांनी तोंडाला बांधून असलेले गमछे, दोन चाकू, एक खंजर, एक लोखंडी रॉड, एक बांबू काठी, नायलॉन दोरी, मिरची पावडर व एक छ-याची गन असे साहित्य जप्त केले.
वरील सर्व आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असल्याचे लक्षात आल्याने व ते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पूर्व तयारीत असतांना मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द अवधूतवाडी पोलिस स्टेशलना गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश यादव, पोलिस हवालदार गजानन धात्रक, बंडू डांगे, पोलिस नायक गजानन डोंगरे, किरण पडघण, हरीश राऊत, पोलिस कॉन्स्टेबल सुधीर पिदुरकर, महेश पांडे, गजानन हरणे, सुरेंद्र वाकोडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी पार पाडलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.