ETV Bharat / state

पत्नीचे अनैतिक संबंध, नातेवाईकाच्या मदतीने पतीचा खून - यवतमाळमधील मोवाड्यात पतीचा खून

पती झोपल्यानंतर पाळतीवर असणाऱ्या आपल्या साथीदाराच्या सहाय्याने पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. खून केल्यानंतर तीने चोरीचा बनाव केला, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच गून्हा कबूल केला.

पत्नीने केला पतीचा खून
author img

By

Published : Aug 10, 2019, 8:08 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मोवाडा गावात एका ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली. सुभाष किसन राठोड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीच्या पत्नीनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने नवऱ्याला मारल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध, नात्यातील साथीदाराच्या मदतीनेच केला पतीचा खून

घाटंजी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मोवाडा (मोठा) येथे सुभाष किसन राठोड याची झोपेत असतानाच डोक्यावर घाव घालून खून केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती त्याची पत्नी आदिना हिने पहाटे शेजारच्या लोकांना दिली. या नंतर स्थानिक पोलिसपाटील यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेव्हा घरातील कपाटातील कपडे व सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच मृताची पत्नी आदिना हिने गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले व घरात चोरी सुध्दा झाली, असा बेबनाव केला. पोलिसांनी सुभाषच्या मृतदेहाची उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यानंतर पुढील चौकशीकरता पत्नी आदिना हिला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. तेव्हा पोलिसांना तिच्या हुलकावणी देण्याऱ्या उत्तरांवरून तिच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी तिचा एका नातेवाईक अंकुश याला मोबाईलच्या लोकेशन्स वरून ताब्यात घेतले. त्या नातेवाईकाला ताब्यात घेतल्यानंतर मात्र पत्नी आदिना हिने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधातून आपण अंकुशच्या मदतीने पती सुभाष राठोड याचा खून केल्याचा गून्हा कबुल केला.

सायंकाळी कुटुंबातील सदस्य दोन मुली, एक मुलगा आणि सुभाष जेवण करून खाटेवर झोपी गेले होते. तेव्हा रात्री पत्नी आदिना हि लघुशंकेच्या निमित्ताने दार उघडून घराबाहेर आली. तेव्हा पाळतीवर असणाऱ्या अंकुश याला माहिती दिली. यानंतर झोपेतच सुभाषच्या डोक्यावर घाव घालून खून केला, अशी कबुली दिली.

Intro:Body:यवतमाळ : घाटंजी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मोवाडा (मोठा) येथे सुभाष किसन राठोड (३६) वर्षे याची झोपेत असतांना डोक्यावर घाव घालून खून केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पत्नी आदिना हिने पहाटे शेजारच्या लोकांना सांगितले तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांना दिली. या घटनेची माहिती गावात पसरताच पोलीसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा केला. या घटनेची फिर्याद मृतकाचा पुतन्या पवन राठोड (२४) यांनी घाटंजी पोलीसात दिली. घरातील कपाटातील कपडे व सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच मृतकाची पत्नी आदिना हिने गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले व चोरी सुध्दा झाली असा बेबनाव पोलिसांना सांगीतला. तेव्हा पोलीसांनी मृतकाचा मृतदेह उत्तरणीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला व चौकशी करिता पत्नी आदिना हिला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांची तिक्ष्ण नजर व गुन्हेगारांची चुक पोलिसांनी हेरून पोलिसांनी एका नातेवाईकांस मोबाइलच्या लोकेशन्स वरून त्ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्या नातेवाईकांला ताब्यात घेतल्याने व पोलीसांच्या बाजीरावाने पत्नी आदिना हिने गुन्ह्याची कबुली पोलीसांना दिली. तेव्हा या घटनेत गावातील (अंकुश आडे,२६) याने मृतक सुभाष राठोड याच्या डोक्यावर घाव मारून खून केला अशी कबुली दिली. मृतकाची पत्नी आदिना व आरोपी अंकुश हिचे अनैतिक संबंधातून खून झाला अशी माहिती आहे.
सायंकाळी कुटुंबातील सदस्य पत्नी, दोन मुली व एक मुलगा व सुभाष जेवन करून दोन खाटेवर झोपी गेले होते. तेव्हा रात्री मृतकाची पत्नी आदिना हि मात्र सुभाष झोपल्यावर लघुशंकेच्या निमित्ताने दार उघडून घराबाहेर आली व पाळतीवर असणाऱ्या अंकुश याला माहिती दिली. तेव्हा झोपेतच सुभाषच्या डोक्यावर घाव घालून खून केला असल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी पत्नी आदिना व अंकुश याला ताब्यात घेऊन अटक केली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट दिली.
पोलिसांनी या खुनाच्या घटनेचा तपास अवघ्या या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे करत आहे. या घटनेच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, गणेश आगे, विजय बसेशंकर, प्रदिप मेसरे, सुखदेव चव्हाण, गणेश घोसे, दत्तु किनाके, साहेबराव राठोड, मंगेश पांडे, सुधीर पिदुरकर होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.