यवतमाळ - नगरपालिकेच्या आरोग्य विभागात सातत्याने सावळा गोंधळ सुरूच आहे. घन कचऱ्याची समस्याच अजून सुटलेली नाही. त्यामुळे महिन्याभरापूर्वीच पदभार घेतलेल्या साधना काळे यांनी संताप व्यक्त केला. वारंवार कर्मचाऱ्यांची मागणी केली. प्रशासन दाद देत नसल्यामुळे संतापलेल्या साधना काळे यांनी आरोग्य विभागालाच कुलूप ठोकले.
आरोग्य विभागात पूर्णवेळ विभाग प्रमुख नाही. शहरामध्ये स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहे. आरोग्य विभागाला पूर्णवेळ विभाग प्रमुख द्यावा, अशी मागणी साधना काळे यांनी मुख्याधिकाऱ्याकडे एक महिना अगोदरच केली होती. महिना उलटल्यावरही मागणी पूर्ण झाली नाही. शेवटी त्रस्त झालेल्या आरोग्य सभापतींनाच आरोग्य विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आणि बाहेर बसूनच ऑनलाइन मीटिंग जॉइन केली. यासर्व मागण्यांवर मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी लावलेले कुलूप काढले.