ETV Bharat / state

कापसाला 'हमीभाव' नाही तर 'कमीभाव'; यवतमाळ शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा - यवतमाळ शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

कापसाला हमी दरापेक्षा कमी भाव देऊन कापूस खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाने ठरवलेल्या दराने कापूस खरेदी करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राळेगाव येथील आसरा या सामाजीक संघटनेने दिला आहे. याबाबात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन दिले आहे.

शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना कापसाला हमी दरापेक्षा कमी भाव देऊन कापूस खरेदी होत असल्याने निवेदन दिले
author img

By

Published : Nov 2, 2019, 6:57 PM IST

Updated : Nov 2, 2019, 7:04 PM IST

यवतमाळ - कापसाला हमी दरापेक्षा कमी भाव देऊन कापूस खरेदी होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाने ठरवलेल्या दराने कापूस खरेदी करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राळेगाव येथील आसरा या सामाजिक संघटनेने दिला आहे. याबाबात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना निवेदन दिले.

यवतमाळ शेतकऱ्यांनी कापसाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी अधिकाऱ्याला निवेदेन दिले.

हेही वाचा - निम्म्याहून अधिक भरलेल्या परभणीच्या येलदरी धरणाला गळती; परिसरात भीतीचे वातावरण

शेतकऱ्यांची लूट होत असून त्वरित दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन चार नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनात म्हटले आहे.
राळेगाव तालुक्यात 4200 ते 4700 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केली जात आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येऊ नये, असे निर्देश आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत प्रत्येक जिनिंगवर कमी दरात कापूस खरेदी सुरू आहे.

तालुक्यात परतीच्या पावसाने कापूस सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावे. तसेच त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, यासह सीसीआय कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावी. अशा न्याय मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारपर्यंत जर याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही, तर रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आसरा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळू धुमाळ, प्रकाश खुडसंगे, युसुफ अली सय्यद, ॲड. प्रीतेश वर्मा, प्रसाद ठाकरे, विलास धुमाळ, शुभम धंदरे, सागर एंबडवार, यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला.

हेही वाचा - हिंगोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा शेतकऱ्यांवर हल्ला; पाच जण गंभीर

Intro:Body:यवतमाळ : हमी दरापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने ठरविलेल्या दराने कापूस खरेदी करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राळेगाव येथील आसरा सामाजिक संघटना व शेतकऱ्यांच्या मुलांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्या करिता उपविभागीय अधिकारी शैलेश काळे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांची लूट होत असून त्वरित दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन चार नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
राळेगाव तालुक्यात 4200 ते 4700 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केल्या जात आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येऊ नये असे निर्देश आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत प्रत्येक जिनिंगवर कमी दरात कापूस खरेदी सुरू आहे. यासोबतच तालुक्यात परतीच्या पावसाने कापूस सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करावे व त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, यासह सीसीआय कापूस खरेदी लवकरात लवकर सुरू करावी अशा न्याय मागण्या करण्यात आल्या. येत्या सोमवार पर्यंत जर याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही, तर रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आसरा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळू धुमाळ, प्रकाश खुडसंगे, युसुफ अली सय्यद, ॲड. प्रीतेश वर्मा, प्रसाद ठाकरे, विलास धुमाळ, शुभम धंदरे, सागर एंबडवार, यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला.

बाईट - बाळू धुमाळConclusion:
Last Updated : Nov 2, 2019, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.