यवतमाळ - जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआय फेडरेशनने कापूस खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत 13 हजार 900 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी दिली. यामुळे कापूस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या स्वीकारल्या २०० शिफारसी
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट झाली. शासनाने कापूस खरेदी केंद्र उशिरा सुरू केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. व्यापाऱ्यांनी हा कापूस कवडी मोल भावात खरेदी केला. यवतमाळ जिल्ह्यातील 17 ठिकाणी असलेल्या बाजार समितीत खरेदी सुरू झाली आहे. सीसीआयने 6 केंद्र सुरू केले. यात राळेगाव, घाटंजी, मुकुटबन, मारेगाव, वणीचा समावेश आहे. फेडरेशनने चार केंद्र उघडले आहेत. पुसद, महागाव, यवतमाळ या ठिकाणी कापूस खरेदी केला जात आहे.
शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला 5 हजार 500 रुपये हमीभाव दिला जात आहे. 9 ते 12 टक्के ओला असलेला कापूस आणावा, असे आवाहन माळवी यांनी केले. खेडा खरेदी थांबविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही, अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - चंद्रपुरात तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न