यवतमाळ - अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करत वैद्यकीय अधिकार्यांनी राजीनामे देत कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्हा परिषदेच्या डॉक्टरांच्या ज्या मागण्या आहेत. त्या निकाली काढण्यासाठी प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
सात महिन्यापासून महसूल, पोलीस, आरोग्य, नगरपालिका सर्व विभाग मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईत काम करत आहे. काही मागण्या घेवून वैद्यकीय संघटनेचे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते. जे सहा ते सात मुद्दे आहेत ते जिल्हा स्तरावर सोडवण्यासारखे आहे, ते आम्ही सोडविणार. तसेच त्या प्रश्नांवर मार्ग काढून ते प्रश्न निकाली काढू. जे मुद्दे राज्यपातळीवर आहेत, ते निकाली काढण्यासाठी प्रधान सचिव यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, शल्यचिकीत्सक कार्यालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉक्टरांच्या, ग्रामीण भागातील डॉक्टरांनी आजपर्यंत केलेल्या प्रयत्नामुळे कोरोनाची परिस्थिती जिल्ह्यात आटोक्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
