यवतमाळ- शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कापूस पीक घेतले आता तेच पीक विकताना शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस केव्हा विक्री केला होईल का याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कापूस विकायचा कधी आणि खरिपासाठी पैसे आणायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अनेक शेतकऱ्यांननी भाव वाढेल म्हणून कापूस घरी साठवून ठेवला. त्यात कापूस जास्त दिवस ठेवला असल्याने त्याच्या संपर्कात आल्यास आता मनुष्याच्या अंगास खाज सुटते. पुढे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्याच्यावर वर्षभराचे नियोजन असते तो शेतीचा महत्त्वाचा खरीप हंगाम आहे. आता काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
जिल्ह्याच्या फक्त कळंब, यवतमाळ आणि आर्णी या तीन केंद्रावर कापूस विक्री होत आहे. शेतकरी नंबर लावतात त्यांचा नंबर आता 2900 च्या पुढे आहे. पणन महासंघ सोशल डिस्टन्सिंग राखत फक्त रोज 10 कापसाच्या गाड्या खरेदी करीत असल्याने 2900 पुढे असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस केव्हा विक्री होऊल याची हमी राहिली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आता शेतकऱ्यांना लोकांकडून घेतलेले कर्ज द्यायचे आहे ते कर्ज के फेडायचे. खरिपाचे नियोजन कसं करायचंअसा प्रश्न शेतकऱ्यांना पडाला आहे.
कापूस पणन महासंघ FAQ दर्जा असलेला कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे आता कमी दर्जाच्या कापसाचे करायचे काय, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. कोरोनामुळे मध्येच कापूस खरेदी बंद झाली होती. आता कापूस खरेदी अत्यंत धीम्या गतीने रोज दहा गाड्या अशा पद्धतीने सुरु आहे.
दररोज 10 गाड्या कापूस खरेदी करत होतो. आता ती क्षमता वाढवत आहोत, असे आनंद उगलमुगले, कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी यांनी सांगितले. तर आम्ही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कापूस खरेदी करू, असे चंद्रकांत गोस्वामी, पणन अधिकारी म्हणाले आहेत.