ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका; काँग्रेसकडून मदत देण्याची मागणी - National Highway Authority

राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या. मात्र, नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही. तसेच पाणी वाहून नेणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे दृष्य
author img

By

Published : Aug 1, 2019, 2:58 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्तेकाम करणाऱ्या यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे अतिरिक्त पाणी जाण्यासाठी असणारे सर्व नाले बुजविले आहेत. मात्र त्या पाण्याला पर्यायी मार्ग तयार करण्यात आले नाहीत. तसेच पाणी निचरा होण्यासाठी ज्या पाईपची व्यवस्था करण्यात आली आहे. ते चुकीच्या पद्धतीने टाकन्यात आले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे.

प्रविण देशमुख, काँग्रेस नेते

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत द्यावी. तसेच, जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतातील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल्या आहेत. संबधित शेतकरी व राहिवाशांना तात्काळ मदत जाहीर करावी. या मागणीसाठी पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे. समस्येची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. वाजाहत मिर्झा यांनी दिला आहे.

Intro:राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे नुकसान; जिल्हा काँग्रेस कमिटीची मदतीची मागणीBody:यवतमाळ : जिल्ह्यातून नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू आहे. यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही. तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले. याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गचे चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली. शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल्या आहेत. संबधित शेतकरी व राहिवाश्यांना तात्काळ मदत जाहीर करावी. या मागणीसाठी पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जिल्ह्याधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वाजाहत मिर्झा यांनी दिला.

बाइट- प्रवीण देशमुख, काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.