यवतमाळ - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी करण्यात येत आहे.
मतदार, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी अथवा मतदान प्रतिनिधी यांना मतदान केंद्राच्या आत भ्रमणध्वनी, कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, कोणतीही ईलेक्ट्रॉनिक वस्तू, टॅब, कोणत्याही प्रकारचा पेन, डिजीटल घड्याळ, कोणत्याही प्रकारचा कागद मतदान केंद्राच्या आत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कोणतीही वस्तू मतदाराजवळ असल्यास त्यांना ती मतदान केंद्राच्या बाहेर जमा करावी लागत आहे. या सूचनेचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड सहिंतेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.
यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन, वणी, पांढरकवडा, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद, उमरखेड येथील तहसील कार्यालयात मतदान पार पडत आहे.