यवतमाळ - जिल्हा बॉडी बील्डर्स अॅन्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने व भगतसिंग क्रीडा मंडळाच्या सहकार्याने विश्वकर्मा श्री जिल्हास्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रथम बक्षीस 11 हजार, द्वितीय बक्षीस 7 हजार तसेच तृतीय बक्षीस 5 हजार रुपये, शिल्ड सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच बेस्ट पोझरला 5 हजार, बेस्ट इंम्प्रूव्हमेंट 5 हजार रोख बक्षीसे देण्यात आली. यावेळी स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. या स्पर्धेत राजेश क्षीरसागर यांनी 60 किलोच्या आतील वजनी गटात प्रथम तर बेस्ट पोसर अशी 3 बक्षीसे कमावली. मोहम्मद ओवेज आणि अनिल पवार यांनी दुसऱ्या गटात बक्षिसे मिळवली.