ETV Bharat / state

Yawatmal Child Acid Attack : एकाच कुटुंबातील दोन मुलांवर अ‍ॅसिड हल्ला

यवतमाळ मधील वणी येथे राहणाऱ्या दोन लहान मुलांवर एकदिवसाआड अ‍ॅसिड हल्ला ( Yawatmal Child Acid Attack ) केल्याची घटना समोर आली आहे. वैयक्तिक वादातून घटना घडली असावी अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत वणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

author img

By

Published : Dec 27, 2021, 4:57 PM IST

यवतमाळ मध्ये दोन लहान मुलांवरअ‍ॅसिड हल्ला

यवतमाळ : येथील हमीद चौकात राहणाऱ्या चार वर्षाच्या मुलीवर आणि सहा वर्षाच्या मुलावर अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसिड ( Yawatmal Child Acid Attack ) हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकदिवसाआड घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, वणी येथील हमीद चौकात राहणाऱ्या शफीउल्लाखां यांच्या चार वर्षांच्या मुलीवर 25 डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने बॅटरीमधील अ‍ॅसिड टाकून जखमी करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी कुठेही वाच्यता न करता औषधोपचार केला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 26 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता शफीउल्लाखां यांच्याच सहा वर्षांच्या मूलावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. या अ‍ॅसिड हल्ल्यात ही दोन्ही मुले जखमी झाली आहेत.

या दुर्घटनेनंतर घाबरलेल्या वडिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शफीउल्लाखां यांच्या वैयक्तिक वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेतील अज्ञातां विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वणी पोलिस ठाण्याचे श्याम सोनटक्के यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.