ETV Bharat / state

Families Boycott Yavatmal : धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य - families Went to live in the forest

गावातील काही दारुड्या नागरिकांनी पारधी महिलांवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार केला आहे. (families Went to live in the forest In Amravati District) महिलांचे लैंगिक शोषण करणे विनयभंग करणे असे प्रकारही गावात घडले असून या महिलांच्या तक्रारीची दखल कोणीही घेतली नाही. शेवटी या जाचाला कंटाळून या महिलांच्या कुटुंबीयांना चक्क गाव सोडावे लागले आहे.

अत्याचाराला कंटाळून साठ कुटुंबाचे जंगलात वास्तव्य

author img

By

Published : Mar 29, 2022, 1:39 PM IST

Updated : Mar 29, 2022, 2:38 PM IST

यवतमाळ - माळवागत या गावात अनेक वर्षांपासून पारधी समाज बांधव वास्तव्याला आहेत. सामाजिक आरक्षणामुळे माळवागत गावाच्या सरपंच पदाची धुरा देखील पारधी समाजाच्या तरुणाकडे आली होती. मात्र, त्याला गावकऱ्यांनी मारहाण केली. गावातील काही दारुड्या नागरिकांनी पारधी महिलांवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार केला आहे. (families Went to live in the forest In Amravati District) महिलांचे लैंगिक शोषण करणे विनयभंग करणे असे प्रकारही गावात घडले असून या महिलांच्या तक्रारीची दखल कोणीही घेतली नाही. शेवटी या जाचाला कंटाळून या महिलांच्या कुटुंबीयांना चक्क गाव सोडावे लागले आहे.

उपासमारीची वेळ गावापासून दूर जंगलात वास्तव्याला असणाऱ्या यासाठी कुटुंबांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. एका पाझर तलावाच्या बाजूला या कुटुंबांनी आश्रय घेतला असून त्यांच्याकडे कुठलाही रोजगार नाही. तसेच, त्यांच्या आजच्या अन्न-पाण्याचीही सुविधा नाही.

जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतली दखल- या प्रकरणाची दखल यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर फुपाटे यांनी घेतली असून त्यांनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर जंगलात राहणाऱ्या पारधी कुटुंबातील महिलांशी संवाद साधला. या महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

Last Updated : Mar 29, 2022, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.