यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड येथे धावत्या बसला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. पुसद -उमरखेड राज्यमार्गावर कुपटी जवळील अंबाळी फाट्यानजीक पुसदकडे जाणारी (एमएच 40 डी 6093) या बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला.
हेही वाचा... रायगडमध्ये तिहेरी हत्याकांड, पतीने पत्नीसह २ लहान मुलांची केली हत्या
बसला आग लागताच चालक उत्तम राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीतील प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. बसच्या पुढील भागात असणाऱ्या इंजिनमध्ये ही आग लागली होती. यावेळी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी पाणी आणून ही आग विझवली. आग लागल्याचे चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने संभाव्य धोका टळला.
हेही वाचा.... खासदार इम्तियाज जलील हरवले... सामान्य नागरिकाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र