ETV Bharat / state

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू - समाजकल्याण विभाग वसतिगृह महागाव

महागाव येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी असलेल्या निवासी शाळेत एका विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाला. मृत विद्यार्थीनी कलगाव येथील रहिवासी असून इयत्ता 7 वीच्या वर्गात शिकत होती.

Suspicious death of student
विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
author img

By

Published : Mar 13, 2020, 12:44 PM IST

यवतमाळ - महागावच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत विद्यार्थीनी कलगाव येथील रहिवासी असून इयत्ता 7 वीच्या वर्गात शिकत होती. या विद्यार्थिनीचा खेळताना पडून मृत्यू झाल्याची माहिती वसतीगृह प्रशासनाने सांगितले मात्र, नातेवाईकांनी मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे.

वसतिगृहात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

मृत विद्यार्थिनी ही महागाव येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी असलेल्या निवासी शाळेच राहत होती. आज सकाळी एका मुलीचा खेळताना पडून मृत्यू झाल्याची माहिती वसतीगृह अधीक्षक मंगला भोयर यांना मिळाली. त्यांनी मुलीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा - कोरोना व्हायरस'चा कापूस उद्योगावर परिणाम; निर्यात घटली

वसतिगृह अधीक्षकांनी मुलगी खेळताना पडली असून तिला रुग्णालयात भरती केल्याचा निरोप तिच्या घरी पाठवला. मृत विद्यार्थिनीच्या गळ्याभोवती आणि हातावर जखमा असल्याने तिच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.