यवतमाळ: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ( Amrit Mahotsav of Freedom in Yavatmal ) वर्षात देशभरात 'हर घर तिरंगा' अभियान ( street play for Har Ghar Tiranga Abhiyan ) राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने यवतमाळ शहरातील नागरिकांनी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावून देशाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करावा ( Har Ghar Tiranga Abhiyan awareness in Yavatmal ), असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी ( Yavatmal CEO Madhuri Madavi ) यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्यावतीने मध्य शहरातून जनजागृती रॅली (Awareness Rally of Yavatmal Nagar Parishad ) काढण्यात आली होती.
अल्पदरात ध्वज उपलब्ध - यवतमाळ नगर परिषदच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ध्वज विक्री केंद्रातून २३ रुपये एवढ्या अल्पदरात नागरिकांना या अभियानाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज पुरवठा करण्यात येत आहे. यवतमाळ नगरपरिषदेच्या वाहनतळ येथे राष्ट्रध्वज विक्रीस उपलब्ध आहे. 'स्वच्छ भारत व माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत यवतमाळ नगर परिषदद्वारा केलेल्या कामाची माहिती सांगणारे स्क्रीन प्ले आणि न.प.च्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मार्मिक पथनाट्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील वीर सैनिकांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल. या जनजागृती रॅलीत सहभागी बाल कलावंतानी हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांनी हिंसाचार, आतंकवाद, भ्रष्टाचार, भेदभाव, आणि नारींवरचा अत्याचार या बाबींना थारा न देता देश उभारणीसाठी बंधुभाव व राष्ट्रप्रेमाला चालना देण्यासाठी एकात्मता जोपासत भारतीयत्वाला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले.
पथनाट्यांना उदंड प्रतिसाद- शहरातील पाच कंदील चौक, जाजु चौक, दत्त चौक, संविधान चौक, एलआयसी चौक आदी परिसरात सादर झालेल्या पथनाट्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सदर रॅलीत न.प.चे अधिकारी, कर्मचारी व मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरभवन येथे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या उपस्थितीत पथनाट्यांचा समारोप झाला.
हेही वाचा- Nupur Sharma : नुपूर शर्माचे स्टेटस ठेवल्याने अहमदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, चौघे अटकेत..