यवतमाळ - अनेक दिवसांपासून शहरातील बीअर शॉपला बारचे रूप आले आहे. तसेच मद्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. या बीयर शॉपी चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी दिली. तसेच आत्तापर्यंत जिल्ह्यातील 11 बीअर शॉपीवर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी बीअर शॉपचे मालक दारूविक्रीसोबत त्याच ठिकाणी मद्य प्राशन करण्याची देखील व्यवस्था करतात. अशा कोणत्याही प्रकारचे मद्य सर्व्ह करण्याची परवानगी या विक्रेत्यांना देण्यात आलेली नाही, असे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशाप्रकारे अवैधरित्या दारू सर्व्ह करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणार असून छापील किंमतीहून अधिक रक्कम आकारणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
हेही वाचा चंद्रपूरमध्ये ३७ लाखांच्या मुद्देमालांसह अवैध दारू जप्त
असा कोणताही प्रकार समोर आल्यास ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी केले. कोणत्याही प्रकारची खाद्य विक्रीची व्यवस्था करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा आठ लाखांच्या अवैध दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त; मोलगी पोलिसांची कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने वणी तालुक्यातील चिखलगाव, वणी, दिग्रस, यवतमाळ, आदी ठिकाणी एकूण 11 बीयर दुकानांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे.