यवतमाळ : जिल्ह्यातील हेल्थ क्लब सुरु करण्यास परवानगी द्यावी, या मागणीकरिता यवतमाळ जिल्हा हेल्थ क्लब संघटनेतर्फे नगरपरिषद समोर आज (सोमवार) मूक प्रदर्शन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यादृष्टीने 15 मार्चपासून सरकारने देशातील सर्व हेल्थ क्लब बंद केले होते. त्यामुळे आजतागायत बंद असलेल्या या हेल्थ क्लब मुळे या क्लब चालकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.
हेही वाचा... देशात गेल्या 24 तासांत आढळले 11 हजार 502 कोरोनाबाधित ; तर 325 जणांचा बळी
सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. जनजीवन सुरळीत होत असताना देखील मात्र हेल्थ क्लब बंद आहे. कोरोनाला हरवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने व्यायाम करणे गरजेचे आहे. या दृष्टीने हेल्थ क्लब सुरु करावे. या करिता शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून हेल्थ क्लब सुरु करू द्यावेत, या मागणी करिता हातात 'वुई आर डायिंग' असे पोस्टर घेत या हेल्थ क्लब चालकांनी यवतमाळ नगरपरिषदेसमोर मूक आंदोलन केले.