यवतमाळ : अमेरिकन व्यावसायिक मासिक असलेल्या 'फोर्ब्स'च्या मुखपृष्ठावर यवतमाळ जिल्हातील श्वेता ठाकरे (महल्ले) झळकल्या (appeared on cover of Forbes American business magazine) आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील (Shweta Thackeray from Yavatmal district) शेतकरी दाम्पत्यानं ग्रामहीतच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम सुरु केलं आहे. आशिया पॅसिफिक भागातील अकरा क्षेत्रातील तंत्रस्नेही उद्योजकांच्या यशोगाथांची माहिती देणारा डिसेंबरचा अंक प्रसिद्ध झालेला आहे. यवतमाळच्या पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे यांच्या 'ग्रामहीत' या कंपनीचा सामाजिक उद्योजकता १०० कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. आता श्वेता ठाकरे या फोर्ब्सच्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकल्यानं जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. Shweta Thackeray On Forbes magazine
फोर्ब्स यादीत स्थान : फोर्ब्स' हे मासिक वर्षातून केवळ आठ वेळा प्रकाशित होते. यात वित्त, उद्योग, गुंतवणूक आणि विपणन या विषयावरील लेख प्रसिद्ध होतात. 'फोर्ब्स' तंत्रज्ञान, संप्रेशन, विज्ञान, राजकारण आणि कायदा यासारख्या संबंधित विषयावरही अहवाल देते. त्यामुळे 'फोर्ब्स' यादीत स्थान मिळवणे साधी सोपी गोष्ट नसते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीतील उच्चशिक्षित शेतकरी पंकज महल्ले आणि श्वेता ठाकरे (महल्ले) या दाम्पत्यानं यश मिळवलं आहे.
ग्रामहीतचं काम आणि फोर्ब्सकडून दखल : श्वेता ठाकरे (महल्ले) आणि पंकज महल्ले यांनी ग्रामहीत ही संस्था शेतकऱ्यांसाठी उभी केली. ही संस्था सध्या शेतमालाच्या बाजारपेठेतील चढउतारात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देते. जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडविण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची 'फोर्ब्स' दखल घेत असते. त्या कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देत असते. 'फोर्ब्स' यादीत निवड व्हावी म्हणून ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रामहीतचाही समावेश होता.
शेतमालविक्रीसाठी सुचवले उपाय : ग्रामहीत ही कंपनी शेतकऱ्यांना शेतमाल शेतात साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते. देशात शेतमाल विक्री सगळीकडेच एका कनिष्ठ चक्रव्यात अडकलेली आहे. पीक काढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात. स्वाभाविक व्यापारी वर्ग शेतमालाचे भाव पाडतो. देणेकरांच्या दबावामुळे व उसनवार फेडण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळे होतात. यासाठी ग्रामहीत कंपनीने काही उपाय सुचवले आहेत.
मोबाईलवर शेतमालाच्या विक्रीची सुविधा : ग्रामहीतकडून माल साठवणुकीची उत्तम शास्त्रीय व्यवस्था तसेच, साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता, पुढेही शेतकऱ्याला माल विकायचा झाल्यास घरूनच मोबाईल क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजारपेठात जाण्याची शेतकऱ्यांना गरज पडत नाही. अशा बाबी गावातच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्यास ते सोयीचे ठरते. त्यामुळे ग्रामहीतने अशीच व्यवस्था यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबांना मिळवून दिली. त्यांनी या पद्धतीचा लाभही उचलला आहे. त्यामुळेच 'फोर्सचे' ग्रामहीत या संस्थेची निवडलेल्या १०० कंपन्यांमध्ये निवड केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितांसाठी 'ग्रामहीत'चा प्रवास : श्वेता महल्ले यांनीही अभियांत्रिक पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी संपादन केली. तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील पंकज महल्ले शेतकरी पुत्राने स्थानिक सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातून बीएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शेती क्षेत्रात कामाचा अनुभव घेत, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मधून समाजकार्याची पदव्युत्तर पदवी मिळवली. काही वर्ष टाटाच्याच सीएसआर प्रकल्पात मोठ्या पगारावर काम केले. यानंतर या दाम्पत्यानं शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ग्रामहीतची स्थापना केली. Shweta Thackeray On Forbes magazine