ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात युती तुटली? यवतमाळ, वणी, उमरखेडमध्ये भाजप विरोधात सेनेचे बंडखोर - यवतमाळ जिल्ह्यात युती तुटली? यवतमाळ, वणी, उमरखेडमध्ये भाजप विरोधात सेनेचे बंडखोर

यवतामाळ आणि वणी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे संतोष ढवळे व माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करून अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे सदरील जागांवर भाजप उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील बंडखोरी करणारे नेते
author img

By

Published : Oct 5, 2019, 2:28 PM IST

Updated : Oct 5, 2019, 3:09 PM IST

यवतमाळ- विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा-शिवसेना पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्ताव्यस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतामाळ, वणी आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेचे संतोष ढवळे, माजी आमदार विश्वास नांदेकर व डॉ. विश्वनाथ विणकरे यांनी बंडखोरी करून अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे सदरील जागांवर भाजप उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया देताने सेनेचे बंडखोर उमेदवार

यवतमाळ विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख आणि गेल्या वेळेसचे शिवसेनेचे उमेदवार संतोश ढवळे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत संतोष ढवळे यांना निसटता पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भाजपचे मदन येरावार १२२७ मतांनी विजयी झाले होते.

यावेळी सदरील जागेवर शिवसेनेने दावा केला होता. मात्र, युतीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संतोष ढवळे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपाचे मदन येरावार यांचे विजयाचे गणित बिघडू शकते.

हेही वाचा- शक्तीप्रदर्शन करत वसंत पुरकेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

वणी आणि उमरेडमध्येसुद्धा बंडखोरी

वणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ही जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे याठिकाणी सेनेच्या विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करून भाजपाचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा- 'रोड नाही, तर व्होट नाही' रस्त्याअभावी पिंपळगाववासियांची फरफट

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील उमरखेड मतदारसंघातसुद्धा शिवसेनेचे डॉ. विश्वनाथ विणकरे यांनीसुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवार दाखल करून भाजपला आव्हान दिले आहे. एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, उमरखेड, वणी या विधासभा मतदारसंघात शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली व अपक्ष म्हणून नामांकन दाखल केले. बंडखोरांमुळे येत्या विधानसभा निवडणुकीतील समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंडखोरांची मनधरणी करण्यात कोण यशस्वी भूमिका निभावणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:Body:यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा-शिवसेना पक्षाला बंडखोरीने ग्रहण लागले. त्यामुळे कार्यकर्ते अस्ताव्यस्त होण्याची शक्यता निर्माण झाली.
यवतमाळ विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख आणि गेल्या वेळेसचे शिवसेनेचे उमेदवार संतोश ढवळे यांनी बंडखोरी करून अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत संतोष ढवळे यांना निसटता पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भाजपचे मदन येरावार 1227 मतांनी विजयी झाले होते. यावेळी या जागेवर शिवसेने दावा केला होता. मात्र, युतीमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिवसैनिकामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव संतोष ढवळे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यांच्या उमेदवारी मुळे भाजपाचे मदन येरावार यांचे विजयाचे गणित बिघडू शकते.

वणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ही जागा युतीमध्ये भाजपाच्या वाट्याला गेल्या मुळे याठिकाणी सेनेच्या विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करून भाजपाचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकूलवार यांचे पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील उमरखेड मतदार संघात सुद्धा शिवसेनेचे डॉ. विश्वनाथ विणकरे यांनी सुद्धा शिवसेने सोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवार दाखल करून भाजपला आव्हान दिले आहे. एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, उमरखेड , वणी या विधासभा मतदार संघात शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली बंडखोरी करत अपक्ष नामांकन दाखल केले.
बंडखोरांमुळे येत्या विधानसभा निवडणुकीतील समीकरण बदलण्याची शकयेता निर्माण झाली आहे. बंडखोरांची मनधरणी करण्यात कोण यशस्वी भूमिका निभावणार या कडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.

mh_ytl_02_vishwas_nandekar_vani_shivsena_bandnkhori_byte_vis_7204456

mh_ytl_03_santosh_dhawle_yavatmal_shivsena_bandnkhori_byte_vis_7204456

mh_ytl_06_vishawnath_vinkare_umarkhad_shivsena_bandnkhori_byte_vis_7204456
Conclusion:
Last Updated : Oct 5, 2019, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.